X
महाराष्ट्र

Pune Porsche Accident Case: ३ लाखांत बदलला अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट? धक्कादायक माहिती आली समोर

तपासादरम्यान डॉ. तावरे यांनी ‘मी गप्प बसणार नाही, मी सर्वांची नावे घेईन,’ असे सांगितले.

Tejashree Gaikwad

पुणे : पुणे पोर्श अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाच्या रक्त तपासणी अहवालात फेरफार केल्याप्रकरणी नुकतीच ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांसह मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या अतुल घाटकांबळे याने डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हळनोर यांच्यावतीने अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबाकडून ३ लाख रुपयांची लाच घेतली.

अपघाताच्या दिवशी डॉ. तावरे आणि अल्पवयीन आरोपीच्या वडिलांचे फोनवर बोलणे झाले होते, असेही तपासात समोर आले आहे. "अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी डॉक्टरांना फोन केला आणि रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आमिष देऊ केले होते", असे पोलिसांनी सांगितले. मीडिया रिपोर्टनुसार, मुलाने मद्यप्राशन केले नव्हते हे दाखवण्यासाठी त्याचे रक्ताचे नमुने दुसऱ्या डॉक्टरांच्या नमुन्यांशी बदलले गेल्याचे संकेत डॉ. तावरेंनी दिले. तपासादरम्यान डॉ. तावरे यांनी ‘मी गप्प बसणार नाही, मी सर्वांची नावे घेईन,’ असे सांगितले.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी स्पष्ट केले होते की, १९ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास ससून रुग्णालयात किशोरवयीन मुलाचा घेतलेला रक्त नमुना टाकून देण्यात आला होता आणि त्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीचा नमुना फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आला होता. फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ अजय तावरे यांच्या सूचनेनुसार सीएमओ डॉ श्रीहरी हळनोर यांनी हा बदल केला.

रक्ताचे नमुने बदलल्याने रविवारी आलेल्या वैद्यकीय अहवालात अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केले नसल्याचे म्हटले होते. तथापि, त्या रात्री अल्पवयीन आरोपीने भेट दिलेल्या बारपैकी एका बारमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो मित्रांसोबत मद्यप्राशन करताना दिसला होता.

दरम्यान, ससून रुग्णालयातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त करण्यात आला आहे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त