महाराष्ट्र

सायबर क्राईम रोखण्यासाठी राज्यात ४३ सायबर लॅब - देवेंद्र फडणवीस

नवशक्ती Web Desk

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अभाधित असून गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले आहे. आता सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी सायबर इंडिग्रेटेड प्लॅटफॉर्म निर्माण केला जात असून त्याअंतर्गत राज्यात ४३ सायबर लॅब सुरु करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा करणारा शक्ती कायदा केंद्राने लवकरात लवकर मंजूर करावा यासाठी पाठपूरावा सुरु आहे. प्रतिबंधात्मक कारवाईच्या माध्यामातून गुन्हेगारांवर वचक निर्माण केला जात आहे. राज्यात अंमली पदार्थांची विक्री, अवैध दारु विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. गुन्हेगारीच्या बाबतीत 'झिरो टॉलरन्स'चे धोरण अवलंबण्याच्या सूचना दिल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात सांगितलं.

यावे्ळी त्यांनी सायबर गुन्हेगारीवर सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली. महाराष्ट्र सायबर गुन्ह्यात ५ व्या क्रमांकारवर आहे. सायबर गन्हेगारी रोखण्यासाठी आपण ४३ ठिकाणी सायबर लॅब सुरु केल्या आहे. तसंच यायबर इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म्या माध्यमातून सोशल मीडिया, बँका, वित्तीय संस्था यांना एकत्रित करुन याप्रकरणातील गुन्ह्यांची लवकर उकल होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी लागणारं प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. नवनवे बदलते तंत्रज्ञान लक्षात घेता बाह्यस्त्रोतांद्वारे संस्थांची मदत घेतली जाईल,अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस