महाराष्ट्र

महाराष्ट्रात ५ गॅरेंटी योजना यशस्वी होतील; कर्नाटकचे ऊर्जा मंत्री के. जे. जॉर्ज यांचा विश्वास

Maharashtra assembly elections 2024 : कॉँग्रेसचे राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ५ गॅरेंटी योजना यशस्वीपणे सुरू आहेत. आम्ही केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणतीही योजना आणत नाही, दीर्घकालीन विचार करून महाराष्ट्रात काँग्रेसने कर्नाटकच्या धर्तीवर ५ गॅरेंटी योजना आणल्या असून त्या राज्यात यशस्वी होईल असा विश्वास कर्नाटकचे ऊर्जा मंत्री के. जे. जॉर्ज यांनी व्यक्त केला.

Swapnil S

पुणे : कॉँग्रेसचे राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ५ गॅरेंटी योजना यशस्वीपणे सुरू आहेत. आम्ही केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणतीही योजना आणत नाही, दीर्घकालीन विचार करून महाराष्ट्रात काँग्रेसने कर्नाटकच्या धर्तीवर ५ गॅरेंटी योजना आणल्या असून त्या राज्यात यशस्वी होईल असा विश्वास कर्नाटकचे ऊर्जा मंत्री के. जे. जॉर्ज यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टार प्रचारक व कर्नाटक सरकारचे ऊर्जा मंत्री के. जे. जॉर्ज यांनी मंगळवारी काँग्रेस भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहंमद, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना के. जे. जॉर्ज म्हणाले की, विकास हा केवळ भाजप सरकारच करू शकते हा एक गैरसमज आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने हा समज खोडून टाकला आहे. काँग्रेस सरकारने कर्नाटकच्या जनतेला गृह लक्ष्मी, शक्ती, गृह ज्योती, अन्न भाग्य आणि युवा निधी या पाच योजनांची गॅरंटी दिली होती. गेल्या दोन वर्षांपासून त्या सुरू आहेत. या योजने अंतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला दरमहा सरासरी चार ते पाच हजार इतके प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ मिळतात. ही सार्वत्रिक मूलभूत उत्पन्नाची संकल्पना आहे, जी गरीब कुटुंबांना थेट आर्थिक मदत पुरवते. या योजनांमुळे राज्य दिवाळखोर होईल, अशी भविष्यवाणी भाजप आणि विरोधी पक्षांनी केली होती. त्यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने राज्याच्या आर्थिक विकासाद्वारे चोख प्रत्युत्तर दिले आहे. अन् या योजना पुढेही चालू राहतील. महाराष्ट्र सरकारने देखील अशीच गॅरंटी या निवडणुकी दरम्यान मतदारांना दिली आहे. या बद्दल मला आनंद आहे, असे जॉर्ज म्हणाले.

... ही देखील विकास न झाल्याची लक्षणे!

आजपर्यंत अनेक साथीचे रोग आले. पण त्यातही पुणे हे औषध निर्मितीमध्ये अग्रेसर आहे. मात्र येथे तयार झालेली औषधे पुणेकरांना उशिरा मिळतात. अनेक आजारांमध्ये चुकीची औषधे किंवा औषधांचा तुटवडा हे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे. त्याच प्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना किमान अन्नधान्य न मिळणे, किमान गरजा पूर्ण न होणे हे देखील विकास न झाल्याची लक्षण असल्याचेही के. जे. जॉर्ज यांनी नमूद केले.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी