महाराष्ट्र

दापोली अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची आर्थिक मदत ; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

नवशक्ती Web Desk

दापोली- हण्र मार्गावर रिक्षा आणि ट्रक यांच्यात झालेल्या घडकेत रिक्षाचालकासह ८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर ६ प्रवासी जखमी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घेटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून शिंदे यांनी या प्रकरणाची माहिती घेतली. यावेली मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसंच या घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांवर योग्य ते वैद्यकीय उपचार हे शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

रविवारी (२५ जून) दुपारी दोन वाजेच्या सुमारास रिक्षा आणि ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात रिक्षा काही अंतर फरफटत गेली. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जणांचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला होता. तर एक महिलेला डेरवण येथे नेत असताना मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रकचालक आणि क्लिनर यांनी घटनास्थळावरुन पळ काढला होता. दापोली पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

विभवकुमारने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण; स्वाती मालीवाल यांनी नोंदविला 'एफआयआर'

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

छगन भुजबळ नाराज; प्रचारात फारसे सक्रिय नसल्याने चर्चांना उधाण

सिंचन घोटाळ्यात तथ्य, मात्र अजितदादा दोषी नाहीत - फडणवीस