महाराष्ट्र

कोकणवासीयांसाठी आणखी ५२ गणपती स्पेशल ट्रेन

नवशक्ती Web Desk


मुंबई :
लाडक्या बाप्पाचे आगमन दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपले आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते. गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने याआधी १५६ गणपती स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे, तर आणखी ५२ गणपती स्पेशल चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे कोकणवासीयांसाठी गणपती स्पेशल ट्रेनची संख्या २०८ झाली आहे.
या विशेष ५२ गाड्यांमध्ये दिवा-चिपळूण दरम्यान ३६ मेमू स्पेशल असून मुंबई-मंगळुरू दरम्यान आणखी १६ विशेष गाड्या असणार आहेत
मेमू स्पेशल दिवा-चिपळूण दरम्यान ३६ आणि १६ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मंगळुरू जंक्शन दरम्यान चालवण्यात येणार आहेत.

दिवा-चिपळूण मेमू विशेष सेवा ३६ फेऱ्या
०११५५ मेमू दिवा येथून १३ ते १९ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत दररोज संध्याकाळी ७ .४५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १.२५ वाजता चिपळूणला पोहोचेल.
०११५६ मेमू चिपळूण येथून १४ ते २० सप्टेंबर आणि २३ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत दररोज दुपारी १ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ७ वाजता दिवा येथे पोहोचेल.

मुंबई - मंगळुरू जंक्शन विशेष १६ फेऱ्या
०११६५ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १५ , १६ ,१७ , १८ , २२ , २३ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा दहा वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५ .२० वाजता मंगलोर जंक्शन येथे पोहोचेल.
०११६६ स्पेशल मंगळुरु जंक्शन १६ , १७, १८,१९ , २३ , २४, ३० सप्टेंबर व एक ऑक्टोबरला दुपारी १.३५ वाजता सुटून लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल.

'या' स्थानकांवर थांबणार
ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा , मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड ब्यंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरथकल आणि ठोकूर येथे थांबेल.

नरेंद्र मोदींच्या डोक्यात घातला जिरेटोप; नव्या वादाला फुटले तोंड, शिवरायांचा अपमान केल्याची मविआची टीका

"प्रफुल्ल पटेल लाज बाळगा..."; मोदींच्या डोक्यात जिरेटोप घातल्यावरून शरद पवार गटाच्या नेत्याने सुनावले खडेबोल

मुंबईतील धक्कादायक प्रकार! कॅफे म्हैसूरच्या मालकाला 'खाकी'चा धाक दाखवून लुटलं, खऱ्याखुऱ्या पोलिसाचाही कटात समावेश

Flying Taxi : आता उडत जायचं! भारतात सुरू होतेय फ्लाइंग टॅक्सी, आनंद महिंद्रांनी शेअर केले डिटेल्स

"बीडमध्ये इनकॅमेरा फेरमतदान घ्या..." बजरंग सोनवणेंचं निवडणूक आयोगाला पत्र