पावसाशी संबंधित घटनांमध्ये ६३ जणांचा मृत्यू; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची विधानसभेत माहिती (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

पावसाशी संबंधित घटनांमध्ये ६३ जणांचा मृत्यू; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची विधानसभेत माहिती

राज्यात १ जून ते ८ जुलै २०२६ या कालावधीत अतिवृष्टी आणि पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये ६३ जणांचा मृत्यू झाला असून ७८ जण जखमी झाले आहेत.

Swapnil S

मुंबई : राज्यात १ जून ते ८ जुलै २०२६ या कालावधीत अतिवृष्टी आणि पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये ६३ जणांचा मृत्यू झाला असून ७८ जण जखमी झाले आहेत. मृतांच्या वारसांना निकषानुसार प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी विधानसभेत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाच्या जयंत पाटील यांनी राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देताना महाजन यांनी आतापर्यंत वीज पडून २३, दरड कोसळून ६, पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने ३, झाड उन्मळून ६ आणि भिंत कोसळून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २०० जनावरांचा मृत्यू झाला असून १० जनावरे जखमी झाली आहेत, अशी माहिती दिली.

सरकारने आपत्ती व्यवस्थापनात कसूर केलेली नाही. मी विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहे. राज्यावर संकट आले असताना सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग