महाराष्ट्र

वन्यप्राण्याऐवजी सापळ्यात अडकला बिबट्या; पाच ऊसतोड कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल

वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या इराद्याने ऊसाच्या शेतात सापळा लावल्याने त्यामध्ये बिबट्या अडकल्याची घटना कराडजवळील सारशिरंबे (ता. कराड) येथे मंगळवारी उघडकीस आली.

रामभाऊ जगताप

रामभाऊ जगताप/कराड

वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या इराद्याने ऊसाच्या शेतात सापळा लावल्याने त्यामध्ये बिबट्या अडकल्याची घटना कराडजवळील सारशिरंबे (ता. कराड) येथे मंगळवारी उघडकीस आली. मात्र या घटनेचा वन विभागाने तपास करत यामध्ये सामील असलेल्या पाच जणांना वन विभागाने ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर ऊसतोड मजूरांकडून दोन बहेली सापळ्यासह तारेचा पिंजरा, टोकदार लोखंडी सळई लाकडी मूठ असलेली, तीन वाघर, एक नायलॉन रस्सी, क्लच वायरचा फास, इत्यादी शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. वन विभागाने प्रकाश बापूराव पवार, सुनिल दिलीप पवार, विशाल दिलीप पवार, मिथून भाऊराव शिंदे, भिमराव बाबुराव पवार या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

साळशीरंबे येथे ऊस तोडण्यासाठी एका साखर कारखान्याने ऊसतोड मजुरांची एक तोंडी आणून ठेवली आहे. या टोळीतील वरील संशयीत येथे ऊस तोड करत असतानाच त्यांनी वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने एका ऊसाच्या शेतात सापळे रचले होते. मात्र या सापळ्यात शिकार सापडण्याऐवजी एक बिबट्या अडकला.

मंगळवारी दुपारी सदर शेताच्या परिसरात काम करणाऱ्या लोकांना बिबट्यासारख्या प्राण्याच्या डरकाळींचा आवाज येऊ लागल्याने त्यांनी याबाबत या ऊस शेत मालकाला याची माहिती दिली. ऊसशेत मालक मारुती संभाजी बोंद्रे कासारशिरंबे यांनी शेतात जाऊन पाहिले असता तेथे एका सापळ्यात चक्क बिबट्या अडकल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत संशयितांकडून दोन बहेली सापळे, तारेचा पिंजरा, लाकडी मूठ असलेली टोकदार लोखंडी सळई, तीन वाघरं, एक नायलॉन रस्सी, क्लच वायरचा फास आदी शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मात्र यावेळी सापळ्यात अडकलेल्या बिबट्याची सुटका करताच त्याने नजीकच्या उसाच्या शेतात धूम ठोकली.

सदरची कार्यवाही सातारचे सहाय्यक वन संरक्षक महेश झांजुर्णे, वनपरिक्षेत्र अधिकारी (कराड) ललिता पाटील, वनपाल बाबुराव कदम, वनरक्षक दशरथ चिट्टे, अभिनंदन सावंत, कविता रासवे, वनसेवक अतुल कळसे, सतीश पाटील यांनी केली. याप्रकरणी वनक्षेत्रपाल ललिता पाटील तपास करीत आहेत.

Satara : पोलीस उपनिरीक्षकाच्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या; हातावर लिहिली सुसाइड नोट

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा

भारत बंदुकीच्या धाकावर व्यापार करार करत नाही; व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले

पँगाँग सरोवराजवळ चीन उभारतोय हवाई सुरक्षा संकुल; चीनचे कटकारस्थान उघड

IND vs AUS : व्हाइटवॉश टाळण्याचे आव्हान; भारताचा आज ऑस्ट्रेलियाशी तिसरा सामना; विराटच्या कामगिरीवर लक्ष