महाराष्ट्र

नवले पुलाजवळ भरधाव ट्रकची सात ते आठ वाहनांना धडक

या घटनेत सात ते आठ वाहनांना ट्रकने धडक दिली. यामुळे पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

Swapnil S

पुणे : पुण्यातील कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने जाणार्‍या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची घटना घडली. या घटनेत सात ते आठ वाहनांना ट्रकने धडक दिली. यामुळे पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास एक ट्रक भरधाव वेगाने जात होता. तेवढ्यात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे पुढे असलेल्या सात ते आठ वाहनांना ट्रकने धडक दिली. या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्या वाहनांमधील काही नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. त्या सर्व जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्या सर्वांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश