महाराष्ट्र

सरसकट आरक्षण नाही! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई : मराठ्यांना सरसकट आरक्षण दिले जाणार नाही. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांनाच आरक्षण दिले जाणार आहे. त्यांच्या रक्तातील नात्यातल्या लोकांनाही त्या आरक्षणाचा आणि नोंदींचा लाभ घेता येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले.

मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर बोलताना फडणवीस म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिंदेंच्या नेतृत्वात तोडगा काढण्यात आला. या निर्णयाचा मला अत्यंत आनंद आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटला असून अत्यंत चांगला मार्ग काढल्याने या आंदोलनाची सांगता झाली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून जे आरक्षण मिळू शकते, त्याच आरक्षणाची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आली. सरकारने काढलेला अध्यादेश मनोज जरांगेंनी स्वीकारल्याने त्यांचेही अभिनंदन करतो. या मार्गातून अडचणी कमी होतील, असेही फडणवीस म्हणाले.

गुन्हे मागे घेणार, पण...

‘‘अंतरवाली सराटीत झालेल्या पोलिसांवरील हल्ल्यापासून ते महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मात्र, ज्या लोकांनी सरकारी बसेस जाळल्या आहेत, ज्यांनी लोकांची घरे पेटवली, पोलिसांना मारहाण केली, अशा लोकांवरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, तर असे गुन्हे हे केवळ कोर्टाच्या आदेशानुसारच मागे घेतले जातील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ओबीसींवर कुठलाही अन्याय नाही

छगन भुजबळ यांनी सरकारच्या मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवर आक्षेप घेतला आहे. यावर फडणवीस म्हणाले, ‘‘आक्षेप ही एक कार्यपद्धती आहे. मात्र, ओबीसींवर अन्याय होईल, असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. मराठा बांधवांना नोंदी नसल्याने आरक्षण मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यासाठी त्यांना आरक्षण मिळण्याचा रस्ता मोकळा केला. त्यांना आरक्षण मिळण्याची जी कार्यपद्धती क्लिष्ट होती, ती सोपी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ज्या मराठ्यांकडे नोंदी नाहीत, त्यांना आरक्षण दिले जाणार नाही, असेही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल