महाराष्ट्र

अबू सालेमची वेळेपूर्वी सुटका? प्रस्ताव विचाराधीन!

वकील फरहाना शहा यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत सालेमने दावा केला आहे की, चांगल्या वर्तणुकीमुळे मिळणाऱ्या सूटीनुसार त्याने २५ वर्षांचा तुरुंगवास पूर्ण केला आहे.

Swapnil S

मुंबई : प्रत्यार्पित गुन्हेगार अबू सालेमच्या वेळेपूर्वी सुटकेचा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे आणि यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली.

सालेमने नोव्हेंबर २००५ मध्ये पोर्तुगालहून प्रत्यार्पण झाल्यापासून केवळ १९ वर्षे तुरुंगात काढल्याची माहिती सरकारने आपल्याच शपथपत्रात दिली असून, सालेमने तुरुंगातून मुक्त करण्यासाठी केलेल्या याचिकेच्या उत्तरात ही बाब नमूद केली आहे. राज्य सरकारने बुधवारी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि अ‍ॅडवैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सालेमच्या याचिकेच्या उत्तरात दोन शपथपत्रे सादर केली.

वकील फरहाना शहा यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत सालेमने दावा केला आहे की, चांगल्या वर्तणुकीमुळे मिळणाऱ्या सूटीनुसार त्याने २५ वर्षांचा तुरुंगवास पूर्ण केला आहे. या याचिकेत नमूद करण्यात आले आहे की, जेव्हा सालेमचे पोर्तुगालहून प्रत्यार्पण झाले, तेव्हा भारत सरकारने आश्वासन दिले होते की त्याला कोणत्याही प्रकरणात फाशीची शिक्षा दिली जाणार नाही आणि २५ वर्षांहून अधिक तुरुंगवासही होणार नाही.

ऐन हिवाळ्यात पावसाचं आगमन! सात जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा इशारा, पुढील २४ तास ढगाळ वातावरण

उरुळी कांचन हुंडाबळी प्रकरण : सरपंच सासू, शिक्षक सासरे… पण घरात सुनेचा छळ; दीप्तीसोबत नेमकं काय झालं? आईने केला खुलासा

समृद्धी महामार्गावरील प्रवाशांना दिलासा; १४ नवे फूड प्लाझा सुरू होणार, जाणून घ्या माहिती

तिजोरीत खडखडाट, विविध कामांचा आराखडा कागदावरच; महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचा आरोप

Mumbai : विक्रोळीत निष्काळजीपणामुळे लाऊडस्पीकर कोसळून ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, CCTV फुटेज व्हायरल