File Photo ANI
महाराष्ट्र

भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या माहितीनुसार मान्सून दोन दिवसात महाराष्ट्रात

येत्या दोन दिवसांत गोवा आणि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये मान्सूनचे आगमन होऊ शकते

वृत्तसंस्था

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी सांगितले की मान्सून सामान्य गतीने पुढे जात आहे आणि येत्या दोन दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. यासह, हवामान कार्यालयाने १० आणि ११ जून रोजी अरुणाचल प्रदेशात आणि पुढील पाच दिवस आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाचा (२०४.४ मिमी पेक्षा जास्त) इशारा दिला आहे.

आयएमडीचे आर. जेनामनी म्हणाले की, मान्सून २९ मे रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल झाला आहे आणि ३१ मे ते ७ जून दरम्यान दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, संपूर्ण केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागामध्ये पोहोचेल.

महाराष्ट्रामध्ये कधी ? 

जेनामनी यांनी पत्रकारांना सांगितले की, मान्सूनला उशीर झालेला नाही. येत्या दोन दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता असून येत्या दोन दिवसांत मान्सून संपूर्ण मुंबईत पोहोचेल.

येत्या दोन दिवसांत गोवा आणि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये मान्सूनचे आगमन होऊ शकते असेही त्यांनी सांगितले.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप