महाराष्ट्र

बंडखोरांवर शिंदे, अजित पवारांची ॲक्शन; राष्ट्रवादीतील आठ, तर शिवसेनेतील तिघांचे निलंबन

Maharashtra assembly elections 2024 : पक्षांतर्गत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. भाजपने बंडखोरी केलेल्या ४० जणांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. काँग्रेसनेही बंडखोरांवर कारवाई केली आहे.

Swapnil S

मुंबई : पक्षांतर्गत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. भाजपने बंडखोरी केलेल्या ४० जणांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. काँग्रेसनेही बंडखोरांवर कारवाई केली आहे. आता महायुतीतील शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने बंडखोरांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. एकनाथ शिंदे यांनी ३, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ८ जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करून पक्षविरोधी भूमिका घेतली. तसेच महायुती सरकारची प्रतिमा मलिन करत जाणीवपूर्वक पक्ष शिस्तभंग केल्याने आठ पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे, अकोला ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार, नांदेड महिला जिल्हाध्यक्षा पूजा व्यवहारे, धुळ्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे, दहिसर तालुकाध्यक्षा ममता शर्मा, तुमसर (भंडारा) तालुकाध्यक्ष धनेंद्र तुरकर, युवक प्रदेश सचिव आनंद सिंधीकर आदींवर कारवाई केली आहे.

दरम्यान, पक्षाचे आदेश झुगारून पक्ष विरोधी कार्यवाही केल्याने शिवसेना शिंदे गटातील तीन जणांवर कारवाई करण्यात आली आहे. जालनाचे जिल्हाप्रमुख महेश अग्रवाल, पालघरचे प्रकाश निकम, कन्नड तालुका प्रमुख केतन काजे यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे शिवसेना ठाकरे गटाकडून सांगण्यात आले.

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: १९ नगरपरिषदांच्या निवडणुकीला स्थगिती; बारामती, अंबरनाथमध्ये पुन्हा गोंधळ

मुंबईच्या नावासाठी उद्धव ठाकरे कडाडले, 'जिथे-जिथे बॉम्बे लिहलंय तिथे...

BLO च्या मानधनात वाढ, पण राज्य सरकारकडून विलंब; निवडणूक आयोगाची तक्रार

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; बूथ लेव्हल अधिकाऱ्यांच्या मानधनात दुप्पट वाढ

Mumbai : पोलीस कॉन्स्टेबलच्या गर्भवती पत्नीची आत्महत्या; पतीसह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल