महाराष्ट्र

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

Swapnil S

"चित्रा वाघ यांनी माझी जाहीर माफी मागावी अन्यथा मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करेन", असा इशारा अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांनी दिला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी पॉर्न स्टारला घेऊन जाहिरात बनविल्याचा आरोप भाजप प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला होता. अप्रत्यक्षपणे नयानी हे पॉर्न स्टार असल्याचे वाघ यांनी म्हटले होते. त्यावरून, काही टीव्ही शो, वेब सिरीज आणि चित्रपटांमध्येही काम केलेल्या नयानी यांनी चित्रा वाघ यांना धारेवर धरले आहे.

चित्रा वाघ यांनी माझ्या एका वेब सीरीजमधील फोटो दाखवून मी पॉर्न स्टार असल्याचा दावा केला. माझ्या अभिनयाला पॉर्न स्टारची उपमा देऊन त्यांनी माझी बदनामी केल्याचा आक्षेप त्यांच्यावर घेतो, वाघ यांनी जे फोटो दाखवले ते माझ्या एका वेब सिरीजमधले आहेत आणि ते त्या भूमिकेचा एक भाग होता, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या एक सुशिक्षित महिला आहेत. कलावंत जेव्हा एखाद्या सिनेमात किंवा मालिकेत काम करतो तेव्हा त्या भूमिकेची जशी मागणी असते त्याप्रमाणे अभिनय करावा लागतो हे त्यांना माहीत असावे, असे म्हणत दोन दिवसात माझी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर मी अब्रूनुकसानीचा दावा दाखल करेन, असे नयानी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करीत म्हटले.

पुढे बोलताना, चित्राताई, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी माझं कुटुंब व्यथित झालं आहे. गेल्या आठ वर्षांत मी माझ्या तीन कुटुंबीयांना गमावलं, त्यापैकी दोघांना तर करोना काळात गमावलं. आता आम्ही तिघेच आहोत. मी एक पिता असून माझ्या दोन लेकरांचं पालनपोषण करतोय. पण राजकीय उद्देशाने माझ्यावर आरोप करणं धक्कादायक आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठी माझी प्रतिमा मलीन केली आहे, असे नयानी म्हणाले. मी एक चारित्र्यवान कलावंत आहे आणि एका कलावंताचा अपमान केला म्हणून वाघ यांनी माझी माफी मागावी अन्यथा मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करेन असा इशाराच त्यांनी दिला.

काय म्हणाल्या होत्या वाघ?

आदुबाळ नाईट लाईफ लिमिटेड प्रोडक्शनच्या जाहिरातीमधील पात्र पॉर्नस्टार आहे. पब, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणण्याचा किळसवाणा प्रकार उद्धव ठाकरे करत आहेत. हा पॉर्नस्टार जाहिरातीमध्ये विचारतो की, महिलांवरील अत्याचार कधी थांबणार? हाच पॉर्नस्टार लहान वयांच्या मुलींबरोबर अश्लील चित्रण करतो. या पॉर्न स्टारचे एका ॲपवरती मुलींबरोबर घाणेरडे कृत्य करतानाचे व्हिडीओ आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात कुठली संस्कृती आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. ही जाहिरात तयार करणारी कंपनी कोणाची? त्याच्या कंपनीचा आणि पॉर्नस्टारचा काय संबंध आहे? असा प्रश्न उपस्थित करत चित्र वाघ यांनी टीका केली होती.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त