महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार! डेलिसल ब्रिजचं उद्घाटन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

नवशक्ती Web Desk

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह काही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य यांनी काही नेत्यांच्या सोबत घेऊन १६ नोव्हेंबर रोजी लोअर परळ येथील डेलिसल ब्रिजचं उद्घाटन केलं आहे. कोणत्याही परवानगीशिवाय हा पूल प्रवाशांसाठी खुला केल्याने आदित्य ठाकरेंसह सुनील शिंदे व सचिन अहिर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने एनएम जोशी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आदित्य यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि अहिर यांच्या विरुद्ध एनएन जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम १४३,१४९,३२६ आणि ४४७ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने पुढे सांगितलं की, लोअर परळमधील डेलिसल ब्रिज परवानगीशिवाय उघडल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुलाचे काम अद्याप बाकी असताना आदित्य यांनी पुलाचं उद्घाटन केलं आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस