महाराष्ट्र

शासन निर्णय प्रसाराकरिता एआय तंत्रज्ञानाचा अवलंब करा; डिजिटल माध्यम धोरण तयार करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचना

लोकहिताचे निर्णय, योजनांची राज्य सरकारच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येते.

Swapnil S

मुंबई : लोकहिताचे निर्णय, योजनांची राज्य सरकारच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येते. लोकहिताचे निर्णय, योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी डिजिटल माध्यम धोरण तयार करा, एआय तंत्रज्ञानाचा वापर करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिल्या.

राज्य शासनाच्या १०० दिवस आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा आढावा सोमवारी घेतला. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, ‘माहिती व जनसंपर्क’चे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते. यावेळी प्रधान सचिव तथा महासंचालक सिंह यांनी सादरीकरणाद्वारे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामकाजात यापुढे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यावर भर द्यावा. डिजिटल माध्यम धोरण तयार करून नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्रावर कॉफीटेबल बुक हवे

महाराष्ट्राच्या विविध पैलू दर्शवणारे कॉफीटेबल बुक तयार करावे. राज्य शासन घेत असलेले निर्णय, योजना व उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत सर्व माध्यमांद्वारे जाणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या प्रतिमा निर्मितीसाठी व माहिती पोहचविण्यासाठी एआय न्यूजरूम तयार करून त्याद्वारे माहिती प्रसारित करण्याचे नियोजन करावे. पत्रकारांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांना गती देण्यात यावी. पत्रकार पुरस्कारांचे लवकर वितरण करण्याचे नियोजन करावे, असेही आदेश फडणवीस यांनी दिले.

राज्यस्तरावर संदर्भ कक्ष

शासकीय योजना, उपक्रम यांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी राज्यस्तरावर संशोधन आणि संदर्भ कक्ष स्थापन करण्यात यावे. डिजिटल माध्यमांद्वारेही योजना, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी डिजिटल मीडिया धोरण लवकरच तयार करण्यात यावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

कोकणी भाविकांना ‘टोलमाफी’; २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर कालावधी

NDA चे उमेदवार राधाकृष्णन यांना पाठिंबा द्या! मुख्यमंत्री फडणवीस यांचा शरद पवार, उद्धव ठाकरेंना फोन

Mumbai : मिठी नदी घोटाळा प्रकरण: ठेकेदार शेरसिंह राठोड याला अटक

हमी देऊनही वांद्रे पूर्व स्कायवॉक अपूर्णच; हायकोर्टाचा पालिका प्रशासनावर संताप; अवमान कारवाईची टांगती तलवार

GST दर ५ व १८ टक्के; १२ व २८ टक्क्यांचा कर टप्पा रद्द होणार; जीवनावश्यक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता