महाराष्ट्र

निलेश राणेंनंतर काँग्रेसच्या 'या' दिग्गज नेत्याने दिले निवृत्तीचे संकेत, म्हणाले...

आज दसऱ्या निमित्ताने सिमोल्लंघनाचा दिवस असताना राज्याच्या राजकारणातून दोन व्यक्तींनी राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे

नवशक्ती Web Desk

आज दसऱ्या निमित्ताने सिमोल्लंघनाचा दिवस असताना राज्याच्या राजकारणातून दोन व्यक्तींनी राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी राजकारणात चित्त लागत नसल्याच्या कारणाने राजकारणातून बाजूला होण्याची घोषणा केली. तर आता दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी देखील आपल्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

सुशिल कुमार शिंदे हे सोलापुरात धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांना पुढच्या लोकसभेच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना त्यांनी आपल्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, "मी हे जाहीरपणे सांगितलेलं आहे की प्रणितीताईच काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार राहतील. मीतर आता राजकारणातून निवृत्त झाल्यासारखाच आहे. पण जी काही मदत लागेन ती मी करत राहीन हे मी तुम्हाला सांगतो."

सुशिल कुमार शिंदे यांनी केलेल्या विधानमुळे आता नवी चर्चा सुरु झाली आहे. कारण सुशीलकुमार हे राजकारणातून निवृत्त झाले म्हणाले. काँग्रेसचा सोलापूरमधील लोकसभेचा उमेदवार प्रणितीशिंदे याच असणार आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षणे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीकडून प्रणिती शिंदेंच्या रुपानं पहिली उमेदवारी जाहिर झाल्यासारखचं आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक