महाराष्ट्र

चौंडी येथे मंत्रिमंडळाची आज बैठक; अहिल्यानगर येथे इमारत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक द्वार खुले होणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त श्रीक्षेत्र चौंडी येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक

Swapnil S

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय, हाळगाव, ता. जामखेड, जि. अहिल्या नगर येथे सभागृह, शेतकरी पुत्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक द्वार खुले होणार आहे. या इमारतीच्या उभारणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबत सोमवारी शासननिर्णय जारी करण्यात आला. अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या यासंदर्भातील पाठपुराव्याला यश आले असून या निर्णयाचे कर्जत आणि जामखेड तालुक्यातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी स्वागत केले आहे. या महाविद्यालयाची स्थापना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकाराने २०१८मध्ये झाली. मंगळवार, ६ मे रोजी श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. हे सभागृह निर्माण झाल्यानंतर परिसरातील शेतकरी पुत्र व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एक सुसज्ज शैक्षणिक मंच उपलब्ध होणार असून ज्ञान, संशोधन व कृषीविषयक संवादासाठी नवे दालन खुले होणार आहे.

हे महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत स्थापन झाले असून ६० विद्यार्थ्यांच्या वार्षिक प्रवेश क्षमतेचे शिक्षण दिले जाते. महाविद्यालयासाठी पूर्वीच प्रशासकीय, वसतिगृह, निवास, ग्रंथालय व अन्य इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

मात्र, स्वतंत्र सभागृह नसल्यामुळे शैक्षणिक कार्यक्रम, व्याख्याने, चर्चासत्रे व कार्यशाळा घेण्यास अडचणी येत होत्या. ही गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या शिफारसीनुसार शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नाशिक यांनी सदर सभागृह इमारतीच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता दिली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संमतीनंतर शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

अटी-शर्तींवर मंजुरी!

मान्यतेअंतर्गत बांधकामास काही अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत: वास्तुविशारदांकडून नकाशे मंजूर करणे, जागेचा ताबा खात्री करून घेणे, स्थानिक प्राधिकरणांची मान्यता घेणे, पर्यावरणविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे, अंदाजपत्रकात अनावश्यक बदल न करणे, खरेदी प्रक्रियेत शासन निर्देशांचे पालन करणे आदी.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’