महाराष्ट्र

Ahmedabad Plane Crash : विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' भारताबाहेर पाठवलेला नाही; केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांची माहिती

अहमदाबाद दुर्घटनेतील एअर इंडियाच्या विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' तपासणीसाठी भारताबाहेर पाठवलेला नाही. एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरो यांच्याकडून 'ब्लॅक बॉक्स'ची तपासणी सुरू असल्याची माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी मंगळवारी दिली.

Swapnil S

पुणे : अहमदाबाद दुर्घटनेतील एअर इंडियाच्या विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' तपासणीसाठी भारताबाहेर पाठवलेला नाही. एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरो यांच्याकडून 'ब्लॅक बॉक्स'ची तपासणी सुरू असल्याची माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी मंगळवारी दिली.

केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राम मोहन नायडू यांनी पुण्यात आयोजित केलेल्या हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट समिट या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळसुद्धा उपस्थित होते. नायडू म्हणाले, की 'ब्लॅक बॉक्स' भारतातच असून एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरो यांच्याकडून ब्लॅक बॉक्सची तपासणी सुरू आहे आणि आम्ही तो बाहेर पाठवणार नाही. फक्त माध्यमात याची चर्चा आहे. पण, वस्तुस्थिती तशी नाही. 'ब्लॅक बॉक्स' डीकोड केल्याने अपघातापूर्वी काय घडले, याची सखोल माहिती मिळेल, असे सरकारने अपघातानंतर स्पष्ट केल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल