महाराष्ट्र

Ajit Pawar Death : 'घड्याळा'नेच अजितदादांची ओळख पटली - प्रत्यक्षदर्शी

अजित पवार यांचे शरीर एका बाजूला पडले होते. आम्ही ते आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. आम्ही एक नवीन ब्लँकेट दिले आणि त्यांचे शरीर त्यात गुंडाळले. सुमारे अर्धा तास आग सुरू होती. चष्मा आणि घड्याळावरून आम्हाला ते अजितदादा असल्याचे ओळखता आले, असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.

Swapnil S

अजित पवारांचे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी एअरपोर्टपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गोजुबावी परिसरातील शेतात कोसळले. अपघात इतका जबरदस्त होता की, विमानाचे तुकडे झाले आणि काही क्षणातच विमानाला भीषण आग लागली. बचाव पथक आले आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अपघातग्रस्त भाग खोलगट असून आजूबाजूला झाडेझुडपे, उसाची शेती आणि काही घरांची वस्ती आहे. पोलिसांनी आम्हाला पाणी आणण्यास सांगितले. आम्ही बादल्यांमध्ये पाणी आणले. अजित पवार यांचे शरीर एका बाजूला पडले होते. आम्ही ते आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. आम्ही एक नवीन ब्लँकेट दिले आणि त्यांचे शरीर त्यात गुंडाळले. सुमारे अर्धा तास आग सुरू होती. चष्मा आणि घड्याळावरून आम्हाला ते अजितदादा असल्याचे ओळखता आले, असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. राजकीय जीवनात ‘घड्याळ’ हेच चिन्ह घेऊन अजित पवारांचा संपूर्ण प्रवास झाला आणि त्याच घड्याळाने त्यांच्या आयुष्याची शेवटची ओळख पटवणे, हा नियतीचा अत्यंत क्रूर खेळ असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

दुर्दैवी योगायोग

अजित पवारांचा अपघाती मृत्यू आणि ६ अंकाशी या घटनेचा असलेला संबंध हा दुर्दैवी योगायोग आहे, असे नेटकरी सोशल मीडियावर म्हणू लागलेत. पवार यांच्या निधनानंतर समोर आलेला एक दुर्दैवी योगायोग संपूर्ण महाराष्ट्राला हेलावून टाकणारा आहे. ६६ वर्षे, ६ महिने आणि ६ दिवस इतके आयुष्य लाभलेल्या या नेत्याने आपल्या कार्यकाळात तब्बल ६ वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. '६' या अंकाचा हा विचित्र योगायोग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ६ क्रमांक आणि अजित पवार यांच्यासोबतचा नियतीचा हा खेळ पाहून राज्यातील कार्यकर्ते भावूक झालेत.

बारामतीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था

विमान अपघातात मृत्यू झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी त्यांच्या कर्मभूमीत, बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारामतीत येऊन अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहतील. तसेच केंद्रातील आणि राज्यातील काही महत्त्वाचे नेतेही यावेळी उपस्थित राहतील. त्यामुळे बारामतीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरात नो फ्लाय झोन लागू करण्यात आला आहे.

Ajit Pawar Death : 'दादा' गेले; महाराष्ट्र हळहळला! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात मृत्यू

Ajit Pawar Plane Crash : सुमित कपूर, शांभवी पाठक, विदीप जाधव, पिंकी माळी यांच्यावर काळाचा घाला

Ajit Pawar death : अपघाताची बातमी दादांच्या आईने पाहिली तेव्हा..."मला दादांना भेटायचे आहे!"

Ajit Pawar Death : दाट धुके, कमी दृश्यमानतेमुळे अपघात; प्राथमिक तपासात पुढे आले अपघाताचे मुख्य कारण

वादळी व्यक्तिमत्त्वाची अखेर...