घड्याळावरून नव्हे, तर DNA व कुर्त्याच्या कापडावरून पटली अजित पवारांची ओळख; पोलिस तपासात झाला खुलासा  
महाराष्ट्र

घड्याळावरून नव्हे, तर DNA व कुर्त्याच्या कापडावरून पटली अजित पवारांची ओळख; तपासात मोठी माहिती समोर

आता तपास सुरू झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस सूत्रांकडून या दाव्यांना स्पष्टपणे छेद देण्यात आला आहे. अजित पवार यांची ओळख घड्याळावरून पटली नाही. उलट अपघातस्थळी त्यांचे घड्याळ अद्याप सापडलेले नाही. सुरुवातीला जे घड्याळ असल्याचा समज झाला, तो प्रत्यक्षात...

Krantee V. Kale

पुणे : २८ जानेवारी रोजी बारामती येथे खासगी चार्टर्ड विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. या अपघातानंतर अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या हातातील घड्याळावरून पटल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र, आता तपास सुरू झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस सूत्रांकडून या दाव्यांना स्पष्टपणे छेद देण्यात आला आहे.

घड्याळावरून नव्हे, तर DNA तपासणीतून ओळख

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांची ओळख घड्याळावरून पटली नाही. उलट अपघातस्थळी त्यांचे घड्याळ अद्याप सापडलेले नाही. सुरुवातीला जे घड्याळ असल्याचा समज झाला, तो प्रत्यक्षात त्यांच्या कुर्त्याच्या जळालेल्या बाह्याचा भाग होता.

सुरुवातीच्या पाहणीत मनगटावर घड्याळासारखी दिसणारी वस्तू प्रत्यक्षात त्यांच्या कुर्त्याच्या बाहीचा जळालेला तुकडा (विशिष्ट कापड आणि खास डिझाईनमुळे) होता. प्राथमिक टप्प्यात त्यांच्या उजव्या हातावरील कुर्त्याच्या कापडावरून ओळख पटवली होती. तरी, कायदेशीर स्पष्टतेसाठी प्रशासनाने DNA चाचणी केली आणि DNA अहवालानंतरच अजित पवार यांच्या मृत्यूची शंभर टक्के खात्री करण्यात आली.

कोचिंग क्लासेसना चाप! प्रस्तावित कायद्याचा मसुदा प्रसिद्ध; इंटिग्रेटेड कोचिंगसह १३ वर्षांखालील मुलांच्या प्रवेशास बंदी; साप्ताहिक सुट्टीची सक्ती

Mumbai : मैदाने वाचवण्यासाठी मुंबईकर रस्त्यावर; पालिकेसमोर आंदोलनाचा आदित्य ठाकरेंचा इशारा

नर्सिंगचा पेपरही फुटला; परभणीत परीक्षा पर्यवेक्षिकेचाच कारनामा

डॉग स्क्वॉडमधील सेवेनंतरही कुत्र्यांची जबाबदारी पोलिसांची; निवृत्त श्वानांना मिळणार पोलीस दलातच निवारा

'सीजेपी' कार्यकारिणीची आज बैठक