महाराष्ट्र

Ajit Pawar Death : दाट धुके, कमी दृश्यमानतेमुळे अपघात; प्राथमिक तपासात पुढे आले अपघाताचे मुख्य कारण

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीला जाताना विमान अपघातात निधन झाले. लँडिंगच्या वेळी झालेल्या या दुर्घटनेत विमानात असलेले सर्व पाचजण मृत्युमुखी पडले. दाट धुके, कमी दृश्यमानता आणि तांत्रिक बिघाडामुळे विमान लँडिंगदरम्यान नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळले असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

Swapnil S

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीला जाताना विमान अपघातात निधन झाले. लँडिंगच्या वेळी झालेल्या या दुर्घटनेत विमानात असलेले सर्व पाचजण मृत्युमुखी पडले. दाट धुके, कमी दृश्यमानता आणि तांत्रिक बिघाडामुळे विमान लँडिंगदरम्यान नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळले असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. अपघाताच्या वेळी बारामती येथील धावपट्टीच्या (लँडिंग स्ट्रिप) परिसरात दाट धुके होते, ज्यामुळे दृश्यमानता केवळ ८०० मीटरपर्यंत आली होती. याच कमी दृश्यमानतेत विमान उतरवण्याचा प्रयत्न केला गेला, ज्या दरम्यान हा अपघात घडला, असे सांगितले जात आहे.

अजित पवार मुंबईहून बारामतीला जात होते. त्यांना तेथे निवडणुकीच्या प्रचारासाठी चार कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचे होते. जिथे हा अपघात झाला, तो बारामतीजवळील शेतजमिनीचा भाग आहे. विमान जमिनीवर कोसळताच आग लागली. विमान हे धावपट्टी सोडून शेजारील भागात कोसळले. लँडिंग करताना विमानाचे नियंत्रण बिघडले होते. लँडिंगचा प्रयत्न करताना विमान अडखळले आणि काही क्षणातच हा अपघात झाला. कोसळल्यानंतर सुमारे पाच स्फोट झाले आणि विमानाला भीषण आग लागली. अपघातानंतर विमान पूर्णपणे जळून खाक झाले आणि त्यात असलेले सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले.

विमान कोसळताच चार ते पाच मोठे स्फोट

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अपघात होण्यापूर्वी हे विमान हवेत काहीसे अस्थिर दिसत होते. एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, विमान बारामती विमानतळाच्या परिसरात घिरट्या घालत होते. धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच हे विमान जमिनीवर जोरदार आदळले आणि मोठा स्फोट झाला. हा आवाज इतका प्रचंड होता, की तो जवळच्या वस्त्यांमधील घरांपर्यंत ऐकू आला. विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी एका बाजूला झुकले होते आणि स्फोटानंतर विमानाचे अनेक तुकडे हवेत उडून आजूबाजूच्या घरांजवळ पडले. दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, विमान धावपट्टीपासून साधारण १०० फूट उंचीवर असतानाच नियंत्रणाबाहेर गेल्यासारखे वाटत होते. विमान जमिनीवर कोसळल्यानंतर काही क्षणातच लागोपाठ चार ते पाच मोठे स्फोट झाले, ज्यामुळे विमानाला भीषण आग लागली व या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे आणि सतत होत असलेल्या स्फोटांमुळे कोणालाही मदतीसाठी विमानाजवळ जाणे शक्य झाले नाही.

अजित दादा पंचतत्त्वात विलीन! शोकाकूल वातावरणात पार्थ आणि जय पवारांनी दिला मुखाग्नी; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

"दादांना म्हणालो होतो रात्रीच कारने जाऊ, पण..."; अजित पवारांच्या चालकाला 'त्या' रात्रीची आठवण सांगताना अश्रू अनावर

Ajit Pawar death : अपघाताची बातमी दादांच्या आईने पाहिली तेव्हा..."मला दादांना भेटायचे आहे!"

'दादा'ला I Love You सांग...; अजित पवारांवर अंत्यसंस्कारापूर्वी बारामती मेडिकल कॉलेजबाहेर कार्यकर्त्याने फोडला हंबरडा, भावूक Video

एका चुकीबद्दल अन्नपाण्याविना केला होता आत्मक्लेश; यशवंतरावांचे स्मृतिस्थळ होते अजितदादांचे शक्तिस्थळ!