महाराष्ट्र

आतापर्यंत राज ठाकरेच नक्कल करत होते...: अजित पवार

एवढ्या दिवसापर्यंत मला वाटत होते की, केवळ राज ठाकरे हेच नक्कल करतात. पण आता दुसरेच समोर आले. हे पाहून माझ्या मनाला वेदना झाल्या. शरद पवारांना मी दैवत मानले होते,

Swapnil S

मुंबई : एवढ्या दिवसापर्यंत मला वाटत होते की, केवळ राज ठाकरे हेच नक्कल करतात. पण आता दुसरेच समोर आले. हे पाहून माझ्या मनाला वेदना झाल्या. शरद पवारांना मी दैवत मानले होते, अशा शब्दात राष्ट्रवादीचे (अप) नेते अजित पवार यांनी शरद पवार यांनी त्यांच्या केलेल्या नक्कलेचा समाचार घेतला.

शरद पवार यांनी मंगळवारी बारामती येथील सभेत अजित पवार यांच्या कथित रडगाण्याची नक्कल केली. याबाबत अजित पवार यांनी बुधवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, शरद पवारांनी केलेली नक्कल मी पाहिली नाही. पण ती माझ्या कानावर आली. नक्कल करणे हा त्यांचा अधिकार आहे. मी त्यावर बोलणार नाही. पण शरद पवार हे राज्य व देशाच्या राजकारणात ज्या उंचीवर आहेत, ते पाहता त्यांनी त्यांच्या मुलासारख्या असलेल्या माणसाची नक्कल करणे अनेकांना आवडले नाही. त्यांच्या जागी इतर एखाद्या - व्यक्तीने असे केले असते तर चालले असते.

बारामती येथील सभेत मी भावनिक झालो, पण मी रुमाल काढला नाही. याउलट त्यांनी रुमाल काढला. आई-वडिलांचे नाव घेतल्यामुळे मी थोडा भावनिक झालो होतो. मी लगेच पाणी प्यालो आणि विषय बदलला. प्रत्येकाला भावना असतात, मन असते. प्रत्येकवेळी माणूस कठोर राहू शकत नाही. जे झाले ते पूर्णतः नैसर्गिक होते, असे अजित पवार म्हणाले.

आम्ही एकाच कुटुंबातील सदस्य आहोत. आम्ही त्यांच्यापुढेच लहानाचे मोठे झालो. त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी आम्ही केल्या. पण त्यानंतरही त्यांनी आमची नक्कल करावी हे बरोबर नाही, असेही अजित पवार म्हणाले.

Maharashtra Rain : महाराष्ट्राला पावसाचा तडाखा; ८३ लाख एकरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान

मराठवाडा पूरग्रस्तांसाठी लालबागचा राजा मंडळाची मदत; पारलिंगी समुदायाने मागितला जोगवा, राज्यातील शिक्षकांचाही पुढाकार

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्ततेनंतर लष्करात पुन्हा स्थान; प्रसाद पुरोहित यांची कर्नल पदी बढती

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून