संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

जुने गेले, तर नव्यांना संधी देऊ! अजित पवारांचा सूचक इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षात जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले असतानाच सोमवारी खुद्द अजित पवार यांनीच...

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षात जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले असतानाच सोमवारी खुद्द अजित पवार यांनीच आपल्यासमवेत आलेल्या आमदारांना एका अनौपचारिक चर्चेच्या वेळी थेट इशारा दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षात सर्वकाही आलबेल नाही, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

याबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण देताना कोणीही, कोठेही जाणार नसल्याचा दावा केला असला तरी पुन्हा एकदा या आमदारांसंदर्भात त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यासोबत आलेले आताचे आमदार माघारी फिरले, तरी काहीही हरकत नाही, आम्ही नव्या लोकांना संधी देऊ, असे अजित पवार यांनी खासगीत चर्चा करताना सांगितल्याची दिवसभर चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या अनेक नवे उमेदवार आहेत, आम्ही एकत्रित असताना अनेक नव्या चेहऱ्यांना आपण संधी दिली, आज तेच चांगल्या पदांवर काम करीत आहेत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केल्याने आपल्यासमवेत आलेल्या आमदारांना हा एक प्रकारचा इशाराच आहे, असे मानले जाते. अहमदनगरचे विद्यमान खासदार नीलेश लंके यांना संधी देण्यासाठी आपण पुढाकार घेतला, लंके आपल्याकडून लोकसभा निवडणूक लढण्यास तयार होते, मात्र पत्नीला विधानसभेची उमेदवारी देण्याची गळ त्यांनी घातली होती. भाजपशी आपण त्याबाबत चर्चाही केली, मात्र तेव्हा भाजपचे विद्यमान खासदार असल्याने ते जागा सोडण्यास तयार नव्हते. जागा धोक्यात असल्याची जाणीवही भाजपला करून दिली होती, मात्र त्यांनी ऐकले नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे विधानसभेच्या २८८ जागांवर सर्वेक्षण

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २८८ जागांचा सर्व्हे करणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ५४ जागा मिळाल्या होत्या, त्या सर्वच जागांवर आमचा दावा असेल. यासोबतच इतर जागांचादेखील आढावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात येणार आहे. या जागांमध्ये नवाब मलिक यांचादेखील समावेश असेल, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. सर्व्हेमध्ये २८८ जागांमध्ये ज्या ठिकाणी आमचे उमेदवार पुढे असतील, त्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने दावा सांगण्यात येणार असल्याचेही प्रफुल्ल पटेल यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले