महाराष्ट्र

Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेबाबत अजित पवारांची विधान परिषदेत मोठी घोषणा, म्हणाले...

अधिवेशनात हा मुद्दा चर्चेला आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर सूचक विधान केलं आहे.

नवशक्ती Web Desk

नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. यामुळे जुन्या पेन्शनचा मुद्दा पुन्हा एकादा ऐरणीवर आला आहे. अधिवेशनात हा मुद्दा चर्चेला आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावार सूचक विधान केलं आहे. जुनी पेन्शन योजना कधी लागू होणार? याबाबत बोलताना अजित पवार यांनी निश्चित वेळ सांगितली आहे.

जुन्या पेन्शन योजनेवर लवकरच निर्णय होणार असल्याचं सुतोवाच अजित पवार यांनी केलं आहे.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी यावर निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी दिला आहे. अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत हा विषय चर्चेला आला असता त्यांनी ही महत्वाची माहिती दिली.

लोकभारतीचे सदस्य कपील पाटील यांनी नियम ९३ अन्वये केलेल्या सूचनेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, "लोकसभेच्या निवडणुकीची तुम्ही चिंता करु नका, हे मजबूत बहुमताचं सरकार आहे. लोकसभेनंतर सहा महिन्यांनी आपली निवडणूक आहे. मी सभागृहाला अश्वस्थ करु इच्छितो की विधानसभा निवडणूक लागायच्या आधी या जुन्या पेश्ननच्या संदर्भात हे सरकार निश्चितपणे निर्णय घेईल"

दरम्यान, नागपूर येथील यशवंत स्टेडियमवर हजारोंच्या संख्येने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी शासकीय नोकरदार वर्गानं जुन्या पेन्शसाठी आंदोलन पुकारलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मागणीसंदर्भात राज्यभरात आंदोलन सुरु आहे. यशवंत स्टेडियमवर सुरु असलेल्या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी भेट देत आपला पाठिंबा दर्शवला आहे.

मुंबईला अवकाळी पावसाचा तडाखा! राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटीतच नोकरीची संधी

झाडांना दिव्यांच्या माळांनी जखडू नका! पर्यावरणप्रेमींचे मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांना भावनिक आवाहन

बालभारतीच्या पुस्तकांची छपाई कमी दर्जाच्या कागदांवर; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

शक्तिपीठ महामार्गात बदलाचे संकेत; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती