संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

आरएसएसशी संबंधितांना वाचविण्यासाठीच अक्षय शिंदेचे एन्काऊंटर; वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी सगळ्यांचीच मागणी होती. मात्र भाजपने आरएसएसशी संबंधित लोकांना वाचविण्यासाठी शिंदेचा एन्काऊंटर केला आहे.

Swapnil S

मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी सगळ्यांचीच मागणी होती. मात्र भाजपने आरएसएसशी संबंधित लोकांना वाचविण्यासाठी शिंदेचा एन्काऊंटर केला आहे. म्होरक्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आले असल्याचा हल्लाबोल विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर केला. अक्षय शिंदे हा शाळेच्या ट्रस्टींचे कारनामे उघड करू शकला असता, त्याआधीच त्याला संपवण्यात आले आहे. त्यामुळे एन्काऊंटर प्रकरणाची न्यायिक चौकशी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यांत फासावर लटकवू असे सांगितले होते. त्यांची फाशी देण्याची पद्धत अशी आहे का? ज्याप्रकारे पोलिसांनी स्पष्टीकरण दिले त्यामधून उत्तरापेक्षा प्रश्नच अधिक निर्माण होतात. अक्षय शिंदेला तुरुंगातून नेतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात त्याच्या चेहऱ्याला मास्क घातलेले असून हातात बेड्या घातल्या आहेत. तशाच अवस्थेत त्याला गाडीत बसवले असेल, तर मग त्याने बेड्या लावलेल्या हाताने बंदूक कशी खेचली? वाहनातून नेताना त्याच्या बाजूला पोलीस बसले होते का? ते बसले असतील, तर आरोपीचा हात पोलिसांच्या बंदुकीजवळ कसा गेला? आरोपीने बंदुकीचे लॉक कसे उघडले? ज्या अधिकाऱ्यांच्या गोळ्यांनी तो जखमी झाला ती गोळी किती अंतरावरून झाडली, असे सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

अहिल्यानगरमध्ये तणाव; रास्ता रोको, लाठीमार

भारत-भूतान रेल्वेमार्गाने जोडणार; प्रकल्पाचा संयुक्त आराखडा जाहीर

पीडितांकडे न्यायालयाचे दुर्लक्ष नको; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू; केरळ भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान