महाराष्ट्र

पुलाच्या अपूर्ण कामाचा गावाला फटका; पावसामुळे संपर्क तुटला

महाजने-बेलोशी मार्गावरील पुलाचे काम वेळेवर न झाल्याने या गावांचा पावसामुळे संपर्क तुटला. ठेकेदाराच्या मनमानी व सुस्त कारभाराबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. तहसीलदारांकडे तक्रार करीत महाजने-बेलोशी मार्ग मोकळा करण्यात यावा, अशी मागणी केली. यावेळी योग्य ती व्यवस्था केली जाईल, असे आशासन तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिले. त्यानंतर बांधकाम अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याची सूचना केली.

Swapnil S

अलिबाग : महाजने-बेलोशी मार्गावरील पुलाचे काम वेळेवर न झाल्याने या गावांचा पावसामुळे संपर्क तुटला. ठेकेदाराच्या मनमानी व सुस्त कारभाराबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. तहसीलदारांकडे तक्रार करीत महाजने-बेलोशी मार्ग मोकळा करण्यात यावा, अशी मागणी केली. यावेळी योग्य ती व्यवस्था केली जाईल, असे आशासन तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिले. त्यानंतर बांधकाम अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याची सूचना केली.

अलिबाग तालुक्यातील महाजने -बेलोशी या गावांना जोडणारा पूल जूना होता. या पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्याचे नियोजन जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केले. जिल्हा नियोजन समितीकडून निधी मंजूर करण्यात आला. सुमारे ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. नवीन पुलाचे काम मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाले. मात्र काम योग्य पद्धतीने होत नसल्याने काही ग्रामस्थांनी आवाज उठवला. अभियंता राहुल शेळके यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामे योग्य पद्धतीने करण्याची सूचना केली. मे महिन्याच्या आत काम होण्याची अपेक्षा होती. मात्र संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे महाजने- बेलोशी येथील नागरिकांना पर्यायी कच्च्या रस्त्याचा आधार घ्यावा लागला.

मोकळी पायवाट तात्पुरती सुरू

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे महाजने नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, तसेच कच्चा रस्ता बंद झाल्याने अत्यावश्यक सेवाही ठप्प झाली. महाजने-बेलोशी गावाचा संपर्क तुटल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पुलाचे काम अपूर्ण स्थितीत असल्यामुळे आगामी काळात त्याचा फटका प्रवासी, विद्यार्थी, रुग्णांना बसणार आहे. अपूर्ण पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल देवांग स्वतः हजर राहिले. त्यांच्या देखरेखखाली स्लॅब टाकण्याचे काम ठेकेदाराकडून करून घेण्यात आले. तूर्तास पायवाट सुरू करण्यात आली आहे.

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२