अलिबागमध्ये पिकअप टेम्पो उलटला; एकाचा मृत्यू 
महाराष्ट्र

अलिबागमध्ये पिकअप टेम्पो उलटला; एकाचा मृत्यू

अलिबाग तालुक्यातील रामराज–भिलजी मार्गावर बोरघर पुलाजवळ पिकअप टेम्पो पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून सुमारे १५ कामगार जखमी झाले आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Swapnil S

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील रामराज–भिलजी मार्गावर बोरघर पुलाजवळ पिकअप टेम्पो पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून सुमारे १५ कामगार जखमी झाले आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘गेल’ कंपनीतील काही कामगार पिकअप टेम्पोमधून रामराज येथे नमाज अदा करण्यासाठी जात होते. दुपारी सुमारे १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान टेम्पो बोरघर पुलाजवळ पोहोचताच वाहन अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्यावर पलटी झाले. या अपघातात टेम्पोमधील प्रवासी कामगार गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढले. त्यानंतर सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

सर्वोच्च न्यायालयाचा वाहनचालकांना इशारा; थकीत दंडवसुलीची गंभीर दखल; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कठोर कारवाईचे आदेश

पिकनिकसाठी आलेल्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; दिवेआगर समुद्रात आळंदीच्या विनर्स अकादमीच्या सहलीची शोकांतिका

मध्य रेल्वेचा कसारा येथे १२ दिवस विशेष ब्लॉक; तिसऱ्या मार्गाच्या कामामुळे उपनगरीय, मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम

No UPI Day : एमडीआर शुल्काला विरोध वाढला; आज 'नो युपीआय डे'? दोन प्रमुख संघटनांकडून परस्परविरोधी भूमिका