अमरावतीत १८० तरुणींचे लैंगिक शोषण; आरोपी मोहम्मद अयाजला ठोकल्या बेड्या; ३५० अश्लील व्हिडीओ व्हायरल  X
महाराष्ट्र

अमरावतीत १८० तरुणींचे लैंगिक शोषण; आरोपी मोहम्मद अयाजला ठोकल्या बेड्या; ३५० अश्लील व्हिडीओ व्हायरल

अमरावती जिल्ह्यात मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या तरुणाने सुमारे १८० मुलींचे लैंगिक शोषण केले असल्याच्या आरोपाने मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २१ एप्रिलपर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Swapnil S

अमरावती : नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण ताजे असतानाच, अमरावती जिल्ह्यातही मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या तरुणाने सुमारे १८० मुलींचे लैंगिक शोषण केले असल्याच्या आरोपाने मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २१ एप्रिलपर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या धक्कादायक प्रकरणाचा अधिक तपास आता पोलिस यंत्रणेमार्फत केला जात आहे.

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या आणि त्यानंतर ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या संशयित आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात भाजप खासदार अनिल बोंडे यांनी संबंधित आरोपीने तब्बल १८० तरुणींचे शोषण करून त्यांचे ३५० व्हिडिओ व्हायरल केल्याचा धक्कादायक आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत ही कारवाई केली असून, या खळबळजनक प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरू आहे.

हे जाळे खूप मोठे पसरलेले

अनिल बोंडे म्हणाले, या प्रकरणात काही मुस्लिम आणि हिंदू समाजाच्या मुली देखील आहेत. हे जाळे खूप मोठे पसरलेले आहे आणि चिखलदरा हॉटेलमधील पोलिसांनी सीसीटीव्ही जप्त करून सहा महिन्यांतील फुटेज तपासले तर त्या आधारे रॅकेट उघड होऊ शकते. पोलिसांनी या प्रकरणाच्या खोलात जायला हवे आणि महिला अधिकारी आणि सायबर मधील अधिकारी यांची नेमणूक केली पाहिजे, अशी मागणी देखील बोंडे यांनी केली आहे.

वर्षभरापासून गैरप्रकार सुरू असल्याची कबुली

दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त करून तपास सुरू केला असून, त्यामध्ये अनेक धक्कादायक अश्लील व्हिडिओ असल्याचे समजते. हे व्हिडिओ आरोपीने आपल्या मित्रांना पाठवले आहेत का, याचा शोध घेतला जात असतानाच त्याचे तरुणींसोबतचे काही अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाले आहेत. आरोपीने पुराव्यांचा नाश करण्यासाठी मोबाईलमधील मोठा डेटा डिलीट केला असला तरी, सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तो रिकव्हर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या एक वर्षापासून हा गैरप्रकार सुरू असल्याची कबुली आरोपीने दिली असून, प्राथमिक चौकशीत त्याने आतापर्यंत सात पीडित तरुणींची नावे उघड केली आहेत.

आरोपी ‘एमआयएम’चा कार्यकर्ता - अनिल बोंडे

परतवाडा पोलिसांनी अश्लील व्हिडीओप्रकरणी ताब्यात घेतलेला युवक ‘एमआयएम’चा कार्यकर्ता असल्याचा खळबळजनक आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला असून, हे केवळ एका व्यक्तीचे कृत्य नसून यामागे एक मोठी टोळी सक्रिय असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या टोळीने स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअ‍ॅॅपवर ग्रुप्स तयार करून हे जाळे पसरवले असल्याचे सांगत, पोलिसांनी संबंधित आरोपींचे मोबाईल जप्त करून त्यांच्या कॉल डिटेल्सची आणि संपर्काची सखोल चौकशी करावी, अशी आग्रही मागणीही बोंडे यांनी यावेळी केली आहे.

Thane : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील दुकानातील मिठाईतून विषबाधा? पाच जणांची प्रकृती बिघडली, एकाचा मृत्यू, FDA कडून तपास सुरू

Diljit Dosanjh Indore Concert : दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; गर्दीचा फायदा घेत मोबाईल लंपास, दोघांना अटक

भंडाऱ्यात लालपरीचा अजब कारभार; रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना अर्ध्या रस्त्यात उतरवलं, पालकांचा संताप, चालक-वाहक निलंबित

Raigad Fire : उरणमध्ये केमिकलच्या गोदामाला भीषण आग! मोठ्या स्फोटाने परिसर हादरला; धुराचे लोट हवेत, VIDEO

छठपूजेचा प्रसाद खाल्ल्याने आईचा संताप अनावर; चार वर्षांच्या चिमुरडीला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू