महाराष्ट्र

Bhagatsingh Koshyari Controversy : राज्यपालांच्या वक्तव्यावर काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

प्रतिनिधी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. (Bhagat Singh Koshyari controversy) यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांचीदेखील प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हंटले की, "महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकणारे हे एकमेव राज्यपाल आहेत. मराठी माणसांवर त्यांचे खूप प्रेम आहे, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. असे असले तरी, अनेकवेळा त्यांच्या विधानांचा चुकीचा अर्थ काढला जातो. याआधीही अनेकदा असे झाले आहे. मात्र, त्यांचे महाराष्ट्रावर प्रेम आहे हे नक्की."

यावेळी अमृता फडणवीस यांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकारानावरही भाष्य केले. "श्रद्धा वालकरची हत्या हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. अशा घटनांच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. तसेच, आरोपीलादेखील कठोर शिक्षा होणे महत्त्वाचे आहे." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, असे बोलत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या वादाला तोंड फोडले. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हे वक्तव्य केले होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?

काय सांगता! Bajajनं आणली चक्क CNG BIKE, 'या' दिवशी होणार लॉन्च