सुप्रिया सुळे, संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

'राष्ट्रवादी'च्या एकत्रीकरणाचा निर्णय निवडणुकांपूर्वी व्हावा; अंकुश काकडे यांचे सुप्रिया सुळे यांना पत्र

दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पवार गटातील पुरोगामी कार्यकत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सुप्रिया सुळे यांना पत्र लिहिले आहे.

Swapnil S

पुणे : दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पवार गटातील पुरोगामी कार्यकत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सुप्रिया सुळे यांना पत्र लिहिले आहे. दरम्यान, पक्षाचे हित पाहून वक्तव्य करावे असा सल्ला अंकुश काकडे यांनी विलीनीकरणाच्या विरोधात असणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला आहे. यासंबंधीचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना निघण्यापूर्वी व्हावा. पक्षाच्या १४ मे रोजी मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत याविषयीची आपली भूमिका मांडू, असेही त्यांनी सांगितले.

यासंदर्भात बोलताना काकडे म्हणाले, शरद पवार यांनी एकत्रीकरणाबाबत भाष्य केल्यानंतर यासंबंधीच्या पक्षांतर्गत चर्चा सुरू झाल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे निर्णय घेतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्या काय निर्णय घेतील ते माहिती नाही. मात्र कार्यकर्ते काय म्हणतात, त्यांच्या भावना काय आहेत, वैयक्तिक मला काय वाटते, हे त्यांना सांगणे माझे कर्तव्य वाटले. म्हणूनच यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. यात मी सध्याची पक्षाची स्थिती, अन्य पक्षांची स्थिती तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी लिहिले आहे. मी १९७८ पासून शरद पवार यांच्याबरोबर आहे. आताही ते घेतील तो निर्णय मान्य असणारच आहे.

महत्त्व कमी होईल, असे वाटणारी मंडळी दोन्ही पक्षात

उद्धव व राज ठाकरे यांच्या एकत्रीकरणाचीही चर्चा होत आहे. वेगळे होऊन ठाकरे बंधूंना अनेक वर्षे झाली आहेत. अजित पवार, सुळे यांना वेगळे होऊन फक्त अडीच-तीन वर्षे झाली आहेत. त्यामुळे या चर्चा होत असतात. दोन्ही गटांचे एकत्रिकरण झाले, तर भविष्य अडचणीत येईल, आपले महत्त्व कमी होईल, असे वाटणारी दोन्ही मंडळी पक्षात आहेत, याकडेही काकडे यांनी लक्ष वेधले.

"...तर महिलांना कोणी नोकरी देणार नाही"; मासिक पाळी रजेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Mumbai : पालिका शाळाही ‘गॅस’वर; मध्यान्ह भोजनात आता विद्यार्थ्यांना फळ वाटप, रुग्णालयांत सिलिंडर पुरवठा करण्यासाठी गॅस कंपनीला पत्र

घरगुती गॅस पुरवठ्यावर सरकारची नजर; जिल्हास्तरीय समित्या स्थापन, अफवांवर कारवाईचा इशारा

ST डेपोच्या विकासासाठी भाडेकराराला ९८ वर्षांपर्यंत वाढ; सरकारकडे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी दाखल

'गॅस अपडेट'च्या नावाने ऑनलाइन फसवणूक; कल्याण-डोंबिवलीत दोन महिलांना ४ लाखांचा गंडा