आणखी एका कंत्राटदाराची आत्महत्या; देयकाची रक्कम न मिळाल्याने उचलले टोकाचे पाऊल, आतापर्यंत ९ कंत्राटदारांनी केली आत्महत्या  
महाराष्ट्र

आणखी एका कंत्राटदाराची आत्महत्या; देयकाची रक्कम न मिळाल्याने उचलले टोकाचे पाऊल, आतापर्यंत ९ कंत्राटदारांनी केली आत्महत्या

आदिवासी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभागाकडील शासकीय देयके न मिळाल्याने सुनील वागद्रे (४३) या शासकीय कंत्राटदाराने शेतात गळफास लावून जीवन संपवले.

Swapnil S

मुंबई : आदिवासी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभागाकडील शासकीय देयके न मिळाल्याने सुनील वागद्रे (४३) या शासकीय कंत्राटदाराने शेतात गळफास लावून जीवन संपवले. राज्यात आतापर्यंत ९ कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या असून राज्य सरकारला कधी जाग येणार, असा संतप्त सवाल कंत्राटदार महासंघाने केला आहे.

महाराष्ट्रातील मौजे जरुड तालुका वरुड जिल्हा अमरावती येथील उद्योमुख शासकीय मान्यताप्राप्त कंत्राटदार सुनीलभाऊ वागद्रे (४३) यांनी देयकाचे अडीच कोटी रुपये न मिळाल्याने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी व लहान मुलगा असा परिवार आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने संबंधित विभागाकडील देयके मिळत नाहीत.

मुंबईत सतत जाऊन देयके मिळावे म्हणून त्यांनी पाठपुरावा केला. संबंधित मंत्री, अधिकारी यांच्या भेटीगाठी घेतल्या, चपला झिजवल्या. मात्र राज्य सरकारकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली, कुटुंब कसे जिवंत ठेवायचे, आपली देयके मिळणारच नाहीत, अशी भूमिका त्यांची झाली आणि यामुळे त्यांना प्रचंड नैराश्य आले. या नैराश्यपोटी त्यांनी आपले जिवन संपविले आहे.

याबाबत शनिवारी १० ऑक्टोबर रोजी या तिन्ही संघटनेच्या राज्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक दुपारी ४ वा होणार आहे. या बैठकीत पुढील आंदोलन बाबत निर्णय घेण्यात अशी माहिती अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नानापर्व निमाले! मराठी, हिंदी नाट्य-चित्रपटसृष्टीचा अष्टपैलू अभिनेता नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड

विरोधकांचे सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन; ज्ञानेश कुमारांविरोधात राजघाटावर काँग्रेसचा ठिय्या

SIR Protest : विरोधकांना संपवण्यासाठीच एसआयआर - अभिजीत दिपके

नाना सर, मैत्री अन् आदराचा अत्यंत सुरक्षित सोबती - सोनाली कुलकर्णी

विजयाबाईंचा लाडका ‘नान्या’ गेला...