महाराष्ट्र

आरक्षणासाठी आणखी एका युवकाने संपवले जीवन

२४ वर्षीय तरुणाने विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली

नवशक्ती Web Desk

नांदेड : मराठा आरक्षणासाठी जालना येथील एका युवकाने मुंबईत भर रस्त्यात आत्महत्या केल्यानंतर रविवारी नांदेड जिल्ह्यातील वडगाव येथे एका युवकाने आत्महत्या केली आहे. ‘एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असा मजकूर लिहून शुभम सदाशिव पवार या २४ वर्षीय तरुणाने विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. शुभम पवार हा प्लंबरचे काम करत होता. शनिवारी सकाळी तो मुंबईहून नांदेडला आला. बहिणीला भेटून गावाकडे येतो, असा निरोप त्याने वडिलांना फोन करून दिला, मात्र शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी शोधशोध करून तामसा पोलिसांना कळवले.

पोलिसांनी शुभमच्या मोबाईल लोकेशनवर त्याचा माग काढला. त्यावरून तो अर्धापूर-तामसा रोडवरील नरहरी मंगल कार्यालयाच्या बाजूस गर्द झाडीत असल्याचे समजले. तामसा पोलिसांनी ही बाब अर्धापूर पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनासथळी जाऊन पाहिले असता, शुभम मृत्तावस्थेत आढळला. त्याच्या शेजारी वरील प्रमाणे मजकूर लिहलेली चिठ्ठी सापडली. अर्धापूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.

UPI वापरणाऱ्या दुकानदारांसाठी खूशखबर! NPCI ने आणली शानदार स्कीम, कसा होणार फायदा? वाचा सविस्तर

एम.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय ठाण्यात; प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या परिसरात महाविद्यालयाला मान्यता

भाडेकरू फ्लॅट खाली करत नाहीये? आता मनमानी चालणार नाही; मुंबई पोलिसांकडून पहिल्यांदाच घराचा ताबा सोडण्याचे आदेश

Mumbai : नव्या सभागृहाचा मार्ग मोकळा! ३२९ नगरसेवकांसाठी प्रशस्त सभागृह उभारण्यास स्थायीची मंजुरी

ठाणे स्थानकातील सरकते जिने प्रवाशांसाठी गैरसोयीचे; १२ डब्यांच्या लोकलमधील प्रवाशांची फरफट, फलाट ५ आणि ६ वरील नियोजनावर प्रश्नचिन्ह