Canva
महाराष्ट्र

जनआरोग्य योजना अधिक सक्षम करणार; बोगस रुग्णांना आळा बसणार, अँटी फ्रॉड ॲप आणणार

बोगस रुग्ण दाखवत विम्या कंपन्या, सरकारी व खासगी रुग्णालयाची फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकार लवकरच अँटी फ्रॉड ॲप आणणार आहे.

Swapnil S

मुंबई : बोगस रुग्ण दाखवत विम्या कंपन्या, सरकारी व खासगी रुग्णालयाची फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकार लवकरच अँटी फ्रॉड ॲप आणणार आहे. खासगी रुग्णालयात आरक्षित २५ टक्के बेड्सची अपडेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद केली जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होणारा डेटा राज्य सरकारच्या वॉररूममध्ये दिसणार आहे. यामुळे खासगी रुग्णालयाकडून होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. दरम्यान, १,३०० पैकी १३१ आजारांचा समावेश सरकारी व खासगी रुग्णालयात करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विधानपरिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी जनआरोग्य योजनेची व्याती वाढवत अधिकाधिक रुग्णालयांचा समावेश करावा, १३७ तालुक्यांमध्ये ही योजना लागू करण्यात यावी, योजनेचा गैरवापर करून खासगी रुग्णालय बोगस रुग्ण आणि बोगस बिले दाखवून विमा कंपन्या आणि सरकारची फसवणूक करत आहेत. ते रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तांबे यांनी यावेळी केली. या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भाई गिरकर, सतेज पाटील सहभागी झाले होते.

दातांवर उपचारांचाही समावेश केला जाणार

योजनेत सर्पदंशावरील उपचारांवरील खर्चाची मर्यादा दीड लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर दातांवरील उपचारांचाही या योजनेत पहिल्यांदा समावेश केला जाणार आहे. त्याचबरोबर किडनी विकारांवरील खर्चाच्या मर्यादेतही वाढ केली जाणार आहे, अशी माहिती

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल