महाराष्ट्र

मोदींकडून नायजेरियातील मराठीजनांचे कौतुक

नायजेरियातील मराठी भाषिक त्यांच्या संस्कृतीशी आणि मुळांशी एकरुप आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषिकांचे कौतुक केले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांना आनंद झाल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

Swapnil S

मुंबई : नायजेरियातील मराठी भाषिक त्यांच्या संस्कृतीशी आणि मुळांशी एकरुप आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषिकांचे कौतुक केले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांना आनंद झाल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

सोशल मीडिया एक्सवरील एका पोस्टमधे मोदी यांनी याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मोदी म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल नायजेरियात मराठी भाषिकांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या संस्कृती आणि मुळांशी ते ज्या पद्धतीने जोडले गेले आहेत ते अतिशय कौतुकास्पद आहे.

पंतप्रधान तीन दिवसांच्या नायजेरिया दौऱ्यावर असून गेल्या १७ वर्षांमध्ये नायजेरियाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. ब्राझील आणि गुयानालाही ते भेट देणार आहेत.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी