महाराष्ट्र

मासळी दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका; मटणापेक्षा मासळीचे दर वाढल्याने अनेकांचा मोर्चा चिकनकडे

सध्या मासेमारी करताना सुरमई, हलवा, पापलेट, कोळंबी, गोबेरा, सकला, बांगडे आदी मासळी मोठ्या प्रमाणात न मिळता तुरळक प्रमाणात मिळत आहेत.

Swapnil S

मुरूड जंजिरा : दर बुधवार, शुक्रवार व रविवारी मच्छी पाहिजे म्हणजे पाहिजे, असे म्हणणाऱ्या मासळी खवय्यांची दरवाढीमुळे पंचाईत झाली आहे. मटणापेक्षा मासळीचे दर वाढल्याने अनेकांनी आपला मोर्चा चिकनकडे वळवला आहे, तर काहीजण चक्क शाकाहारी बनले आहेत.

मासळीचे दर गगनाला भिडल्याने मासळीचा आस्वाद कसा घ्यायचा, असा प्रश्न खवय्यांना पडला आहे. साधी कोळंबी छोट्या टोपलीद्वारे दिली जाते. तिची किंमत ३५० रुपये झाली आहे.

मुरूड मासळी बाजारात मासळीचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने लोक हैराण झाले आहेत. नुकताच मासळीचा मोठा हंगाम झाला. त्यावेळी मासळी खूप स्वस्त दरात व माफक मिळत होती. परंतु मागील काही दिवसांपासून मासळीचे दर कमालीचे वाढल्याने सर्वजण त्रस्त झाले आहेत.

मच्छिमारांनी सांगितले की, खोल समुद्रात जाऊनही मुबलक मासळी मिळत नाही. खोल समुद्रात एलईडीद्वारे मासेमारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु मत्स्य विभाग कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने अवैध व गैरमार्गाने मासेमारी करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. एलईडीद्वारे मासेमारी केल्याने ्जास्तीत जास्त मासे त्यांना मिळतात व जाळ्याद्वारे मासेमारी करणाऱ्या लोकांना मासेच मिळत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य मच्छिमार खूप हताश दिसून येत आहेत.

सध्या मासेमारी करताना सुरमई, हलवा, पापलेट, कोळंबी, गोबेरा, सकला, बांगडे आदी मासळी मोठ्या प्रमाणात न मिळता तुरळक प्रमाणात मिळत आहेत. मुरूड तालुक्यातील ६५० छोट्या-मोठ्या होड्या मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात जातात. मात्र, त्यांना पुरेशी मासळी मिळत नाही. रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले म्हणाले की, सकाळी थंडी वाढली आहे. या हवामानात बदल झाल्याने मासळी दूरवर निघून गेली आहे. वातावरणात समतोलता आल्यानंतर पुन्हा मासळी मोठ्या प्रमाणात मिळेल, असे ते म्हणाले.

मासळींचे सध्याचे दर

मोठी सुरमई एक नग २५००

मध्यम सुरमई एक नग १५००

रावस एक नग ८००

कोलंबी एक किलो ६००

मोठा हलवा एक नग १५००

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल