महाराष्ट्र

उद्धव ठाकरे काळारामाचे नाही तर तळीरामाचे भक्त, आदित्य ठाकरेंना लोकसभेला निवडून आणून दाखवावे : आशिष शेलार

कोरोना काळामध्ये मंदिरे बंद ठेवून मदिरालय उघडणारे उद्धव ठाकरे हे काळारामाचे नाही तर तळीरामाचे भक्त आहेत...

Swapnil S

मुंबई : कोरोना काळामध्ये मंदिरे बंद ठेवून मदिरालय उघडणारे उद्धव ठाकरे हे काळारामाचे नाही तर तळीरामाचे भक्त आहेत अशी टीका करीत तुम्ही आदित्य ठाकरेंना लोकसभेच्या निवडणुकीत उतरून निवडून आणून दाखवा असे थेट आव्हान मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला दिले.

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतींना काळाराम मंदिरातील उपस्थितीबद्दल लिहिलेल्या पत्राविषयी बोलताना शेलार म्हणाले, आज लवकर सकाळी उठल्यामुळे त्यांची डोळ्यावरची झोप आणि झडप गेली नसावी म्हणून उद्धव ठाकरे यांना काही घडलेल्या आणि सत्य घटनांचे ज्ञान नाही. संजय राऊत यांनी त्यांना दिलेली स्क्रिप्ट मुद्दामून अडचणीत आणणारी आणि चुकीची दिलेली असावी. उद्धव ठाकरे आमच्या विश्व हिंदू परिषदेच्या ट्विटर हँडलवर जरी केले असते तरी त्यांना दिसले असते की, कालच देशाच्या राष्ट्रपतींना विश्व हिंदू परिषदेने निमंत्रण दिले आहे आणि हे २४ तासानंतर जागे झाले आहेत. त्यामुळे निमंत्रण राष्ट्रपतींना पोहोचले आहे. यांनी सांगण्याची काही गरज नाही, यांच्या सांगण्यावरून कुणाला आम्ही निमंत्रण देणार नाही आणि हे बोलले म्हणून यांनाही आम्ही निमंत्रण देणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बोलण्याची पातळी उद्धव ठाकरे यांना अजून आली नाही. कल्याण डोंबिवली शहरात उद्धव ठाकरे (उबाठा) यांच्या पक्षाची एक जागा निवडून आणून दाखवावी. मर्दांचा पक्ष उबाठा असेल तर त्यांनी स्वतः किंवा स्वतःच्या सुपुत्राला लोकसभेला निवडून आणून दाखवावे, अशीही टीका त्यांनी केली.

Navi Mumbai : खारघरमधील भूखंडाला सर्वाधिक बोली; सेंट्रल पार्कलगतचा प्लॉट तब्बल २१०० कोटींना

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक; प्रवाशांची होणार गैरसोय

निवडणुकीच्या तोंडावर सरकारला गरीबांची आठवण; 'शिवभोजन थाळी'ची पुन्हा घेता येणार चव; २८ कोटींचा निधी उपलब्ध

मतदार यादीतील घोळ दूर करण्यासाठी कोलंबिया पॅटर्न; आज महाराष्ट्रात येणार कोलंबियाचे पथक

Mumbai : सर्व मेट्रो संस्थांच्या एकत्रीकरणासाठी समिती; ३ महिन्यांत अहवाल शासनास करणार सादर