गणेशोत्सव महोत्सवासाठी व्यापक कृती आराखडा तयार करा; सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश (Photo-X)
महाराष्ट्र

गणेशोत्सव महोत्सवासाठी व्यापक कृती आराखडा तयार करा; सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केल्यानंतर यंदाच्या वर्षी हा उत्सव अधिक व्यापक, सुबद्ध आणि लोकसहभागातून साजरा करण्यासाठी सर्व शासकीय विभागांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा.

Swapnil S

मुंबई : राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केल्यानंतर यंदाच्या वर्षी हा उत्सव अधिक व्यापक, सुबद्ध आणि लोकसहभागातून साजरा करण्यासाठी सर्व शासकीय विभागांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा. त्यासाठी विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करून कृती आराखडा तयार करून शासन निर्णय तातडीने तयार करावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी येथे दिले.

गणेशोत्सवाच्या नियोजनासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत शेलार यांनी आज विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत उत्सवाच्या आयोजनाचा सविस्तर आढावा घेतला. यंदाच्या वर्षी राज्यातील सर्व विभागांनी गणेशोत्सवासाठी किमान उपक्रम निश्चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. जिल्हाधिकारी, महानगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पोलीस, उद्योग, पर्यटन, शिक्षण, सांस्कृतिक कार्य आदी सर्व विभागांचा समन्वय साधून एकसंध कृती आराखडा तयार करावा, अशी सूचना शेलार यांनी दिली.

गणेशोत्सव राज्य महोत्सवाची एकसमान ओळख निर्माण करण्यासाठी अधिकृत लोगो, गीत, माहिती, शिक्षण आणि जनजागृती साहित्य सर्व विभागांना उपलब्ध करून देण्यात यावे. राज्यभरातील सर्व कार्यक्रमांमध्ये त्याचा एकसमान वापर करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. राज्यातील कला, संस्कृती आणि लोकपरंपरांना चालना देण्यासाठी शाडूच्या मूर्ती तयार करणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन, महाविद्यालयीन युवकांचा सहभाग, शालेय विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक उपक्रम, हस्तकला प्रदर्शन, सामाजिक जनजागृती आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विशेष उपक्रम राबविण्याबाबतही बैठकीत विचारविनिमय झाला.

सीएसआरचा वापर करावा

उद्योग क्षेत्रातील कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर करून विविध सांस्कृतिक उपक्रमांना सहकार्य मिळविणे, मराठी मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग वाढविणे तसेच पुढील १० ते १२ दिवसांत व्यापक कृती आराखडा आणि शासन निर्णय अंतिम करण्याच्या सूचनाही आशिष शेलार यांनी बैठकीत दिल्या.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपाहारगृह सील; FDA ची कारवाई, १५ दिवसांसाठी परवाना रद्द 

नीट पेपरफुटीविरोधात निषेधाचा सूर; विविध पक्ष-संघटनांचा निषेध; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

कोकण-उत्तर महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार; पालघरमध्ये पूरस्थिती, नाशिकमध्येही जनजीवन विस्कळीत

पश्चिम रेल्वेवरील गाड्यांना पावसाचा फटका; एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्राचे शिक्षणच घेतले नाही; ईडीसमोर भोंदूबाबा खरातची कबुली