ढोंगी बाबा अशोक खरातच्या कार्यालयावर 'ईडी'चा छापा 
महाराष्ट्र

ढोंगी बाबा अशोक खरातच्या कार्यालयावर 'ईडी'चा छापा

नाशिकमधील ढोंगी बाबा अशोक खरात याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत असताना ‘अंमलबजावणी संचालनालया’ने (ईडी) शुक्रवारी नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील खरातचे व्यावसायिक कार्यालय असलेल्या ‘ओक्स प्रॉपर्टी ऑफिस’वर छापेमारी केली.

Swapnil S

आशिष सिंह/मुंबई

नाशिकमधील ढोंगी बाबा अशोक खरात याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत असताना ‘अंमलबजावणी संचालनालया’ने (ईडी) शुक्रवारी नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील खरातचे व्यावसायिक कार्यालय असलेल्या ‘ओक्स प्रॉपर्टी ऑफिस’वर छापेमारी केली. एसआयटीने २६ मार्च रोजी या आवारावर छापा टाकून १०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडीओ आणि इतर साहित्य जप्त केल्यानंतर हे कार्यालय सील केले होते.

‘एसआयटी’ने दिलेल्या माहितीनुसार, या शोधमोहिमेत नाशिक, पुणे आणि सोलापूर येथील ८० पेक्षा जास्त मालमत्तेची कागदपत्रे आणि ५२ सातबारा उतारे जप्त केले. यात शिर्डीतील १० ते १२ कोटी रुपयांचे वेडिंग लॉन, नाशिकमधील ५ कोटी रुपयांचा बंगला, सोलापूर आणि सिन्नरमधील १५ कोटी रुपयांची शेतजमिनीचा समावेश आहे.

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२