खरातच्या मालमत्तांवर राज्यात EDच्या धाडी; २.४ कोटी गोठविले; मर्सिडिज जप्त; ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी 
महाराष्ट्र

खरातच्या मालमत्तांवर राज्यात EDच्या धाडी; २.४ कोटी गोठविले; मर्सिडिज जप्त; ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी

ईडीने सोमवारी खरात आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या (पैशांची बेकायदेशीर देवाणघेवाण) चौकशीच्या संदर्भात राज्यभरात अनेक ठिकाणी छापे टाकले.

Swapnil S

नाशिक : महिला लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेल्या भोंदू अशोक खरातला सोमवारी न्यायालयाने ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी खरात आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या (पैशांची बेकायदेशीर देवाणघेवाण) चौकशीच्या संदर्भात राज्यभरात अनेक ठिकाणी छापे टाकले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ एप्रिल रोजी नोंदवण्यात आलेल्या अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवालाच्या आधारे एजन्सीने नाशिक, पुणे, मुंबई आणि शिर्डी येथील १३ ठिकाणी छापे टाकले. नाशिकच्या तृप्ताबाला निवासस्थानीही ईडीने छापेमारी केली आहे. तिथे खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. शिर्डी परिसरातील समता पतसंस्थेच्या राहता येथील शाखेत ईडीचे अधिकारी पोहोचले असून तिथे ते अशोक खरात नॉमिनी असलेल्या १०० खात्यांबाबतची चौकशी करत आहेत. या खात्यांमधून तब्बल ६० कोटींहून अधिक रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे.

ईडीच्या पथकांनी खरात याच्या नाशिकमधील निवासी मालमत्तेसह, एक फार्महाऊस आणि दोन संस्थात्मक परिसरांमध्ये तपासणी केली. त्यांच्या निवासस्थानी झडती सुरू असताना खरात यांची मुलगी तिथे उपस्थित होती, मात्र त्यांची पत्नी तिथे नव्हती. तसेच, खरात यांच्याशी मालमत्ता व्यवहारांशी संबंधित असलेल्या नाशिकमधील एका नामांकित बिल्डरच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले.तर पुण्यात एजन्सीने खरात यांचे चार्टर्ड अकाउंटंट प्रकाश पोफळे यांच्याशी संबंधित तीन ठिकाणी झडती घेतली. यात पोफळे यांचे कार्यालय आणि त्यांची मुले ललित आणि हर्षल पोफळे यांच्याशी संबंधित दोन निवासी ठिकाणांचा समावेश आहे.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके