महाराष्ट्र

असीम सरोदे लढवणार संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरुणाची बाजू; म्हणाले, "समर्थन नाहीच, पण..."

बुधवारी(१३ डिसेंबर) लोकसभेचं कामकाज सुरु असताना तरुणांनी संसदेत तसंच संसदेच्या बाहेर गोंधळ घातला. यातील एक तरुण हा लातूरच्या चाकूर तालुक्यातील झरी गावाचा आहे. अमोल शिंदे या तरुणाचं नाव आहे. दिल्ली पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून त्याच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Swapnil S

बुधवारी(१३ डिसेंबर) लोकसभेचं कामकाज सुरु असताना तरुणांनी संसदेत तसंच संसदेच्या बाहेर गोंधळ घातला. यातील एक तरुण हा लातूरच्या चाकूर तालुक्यातील झरी गावाचा आहे. अमोल शिंदे या तरुणाचं नाव आहे. दिल्ली पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून त्याच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात अमोल शिंदे या तरुणाची कायदेशीर बाजू वकील असीम सरोदे हे लढवणार आहेत. दरम्यान,तरुणांच्या कृत्याचं समर्थन नाहीच परंतु तरुणांचं गुन्हेगारीकरण करु नये, अशी प्रतिक्रिया असीम सरोदे यांनी दिली आहे.

असीम सरोदे म्हणाले की, अमोल शिंदे आणि त्याच्या सहकाऱ्यांचा उद्धेश गुन्हेगारी स्वरुपाचा नव्हता. गरिबी आणि बेरोजगारीचा मुद्दा प्राधान्याने विचारात घ्यावा, असं त्याचं मत होतं.अर्थात तरुणांचं आंदोलन समर्थनीय नाही. तरुणांनी संसदेत घुसून धुराच्या नळकांड्या फोडल्या. ही आंदोलनाची पद्धत होऊ शकत नाही. पण, त्यांचा उद्धेश कुणालाही जीवितहानी पोहचवण्याचा नव्हता, तर सरकारला जागे करण्यासाठी होता. त्या उद्देशाने तरुण संसदेत गेले असतील, तर गुन्हेगारीकरण करणारी प्रक्रिया वापरु नये.

लोकांमध्ये प्रशासनाबद्दल असंतोष तीव्र होत आहे. या लोकांशी सरकारने चर्चा केली पाहिजे. लोकशाहीत सरकारनं व्यापकपणा दाखवणं गरजेचं आहे. आपण सरकारला 'मायबाप' असं संबोधत असतो. आपल्या घरातील मुलगा रागाने प्रेरित झाला असेल तर त्याचा राग शांत करणे आवश्यक आहे. त्याला शिक्षा करणं हे संयुक्तिक ठरत नाही, असं सरोदे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, तरुणांवर यूएपीएसारखी गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. हे गुन्हेगारीकरण आहे. पण, सरकारने हे पाऊल उचलू नये. तरुणांना शिक्षा झाली पाहिजे. परंतु, सरकारनं तरुणांचे प्रश्न समजून घेऊन काम केलं पाहिजे. चार जणांवर कारवाई केली तर इतर तरुण भडकतील. भारतात बेरोजगारांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे, असं देखील त्यांनी म्हटलं.

संससेद धुडगुस घालणं मान्य नाही, पण...

पोलिसांनी अमोलवर लावलेली कलमे योग्य की अयोग्य, त्या कायदेशीर चौकटीत बसतात का? याबाबत आक्षेप घेतले पाहिजेत. न्यायालयात अमोलला जामीन मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. कारण, संसद आपल्या सर्वांचा अस्मितेचा मुद्दा आहे. तिथं जाऊन कुणी धुडगूस घालणं मान्य नाही. पण, उद्धेश समजून न घेता सरकारनं कडक कारवाई करुन तरुणांचं गु्न्हेगारीकरण करु नये, असं देखील सरोदे यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी