पियूष गोयल यांचे संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

धर्माच्या आधारावर मत मागणे हे राज्यघटनेच्या मूल्यांविरोधात! केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचे स्पष्ट प्रतिपादन

Maharashtra assembly elections 2024 : धर्माच्या आधारावर मते मागणे हे राज्यघटनेच्या मूल्यांविरोधात आहे, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी केले.

Swapnil S

मुंबई : धर्माच्या आधारावर मते मागणे हे राज्यघटनेच्या मूल्यांविरोधात आहे, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी केले.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना गोयल म्हणाले की, निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळण्यात काँग्रेस पक्ष अपयशी ठरला आहे. तसेच शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर अफवा पसरवणाऱ्या पक्षांशी आघाडी केल्याचा आरोप त्यांनी केला.

मतदारांना धर्मावर आधारित निवडणुकीत मतदानासाठी आवाहन करणे अयोग्य आहे. धर्माच्या आधारावर मत मागणे हे राज्यघटनेच्या तत्वांच्या विरोधात आहे,असे ते म्हणाले. विकास व प्रगतीसाठी भाजपप्रणीत महायुतीला मतदारांनी निवडून द्यावे. मतदानाचा निर्णय हा धार्मिक पूर्वग्रहदूषितमुक्त असावा. सर्वसमावेशक धोरणांबाबत महायुतीची बांधिलकी आहे. धार्मिक मतभेद टाळून विकासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

२०१९ च्या निवडणुकीतील निकालापेक्षा यंदाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. आमच्या विकास यात्रेतून कोणीही वगळले जाऊ नये, याकडे आमचे लक्ष आहे, असे त्यांनी सांगितले.

कॉंग्रेसकडून शेतकरी, तरुणांची फसवणूक

काँग्रेसने अनेक राज्यात विविध आश्वासने दिली होती. त्यांनी शेतकरी व तरुणांची फसवणूक केली. पण, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी महायुतीचा मार्ग स्पष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.

भाजपचे ज्येष्ठ नेते राज्यातील प्रचारात सहभागी झाल्याने महायुतीच्या विजयाला मोठा हातभार लागणार आहे. एकात्मता व विकासाचा संदेश राज्यातील मतदारांना दिला जात आहे. भविष्याचा विचार करून नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

भारतीय संघाची सामन्यावर पकड;जयस्वाल, राहुल यांची नाबाद अर्धशतके; बुमराच्या विकेटचे पंचक

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते