महाराष्ट्र

‘त्या’ पोलिसांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी; पुण्यात तरुणींवर बेकायदेशीर कारवाई

पुण्यातील कोथरूड पोलिसांनी तीन तरुणींच्या घरात घुसून त्यांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतले, त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. ज्या पोलिसांनी हा प्रताप केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? या पोलिसांवर ॲट्रॉसिटी कलमाखाली तत्काळ गुन्हे दाखल करून अटक करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

Swapnil S

मुंबई : पुण्यातील कोथरूड पोलिसांनी तीन तरुणींच्या घरात घुसून त्यांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतले, त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. ज्या पोलिसांनी हा प्रताप केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? या पोलिसांवर ॲट्रॉसिटी कलमाखाली तत्काळ गुन्हे दाखल करून अटक करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

एका महिलेला मदत केल्याच्या कारणावरून या तीन सामाजिक कार्यकर्त्या तरुणींच्या घरात घुसून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते. या मुजोर पोलिसांना कोण पाठीशी घालत आहे? कोणाच्या दडपणाखाली पोलीस काम करत आहेत, तीन तरूण मुलींवर पोलीस अत्याचार करतात आणि कारवाई होत नाही. एफआयआर नोंदवण्यास कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याच्या पालकमंत्र्यांनी जातीने याप्रकरणी लक्ष घालून पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.

पुण्यातील गुन्हेगारी मोडीत काढावी!

पुण्यात ड्रग्जचा काळाबाजार खुलेआम सुरू आहे. कोयता गँगचा हैदोस सुरू आहे, त्याला आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. पुण्यात दादागिरी वाढली आहे असे खुद्द मुख्यमंत्रीच जाहीरपणे सांगत आहेत. पण कारवाई मात्र करत नाहीत. पुणे पोलिसांनी सर्वसामान्य लोकांना कायद्याचा नाहक बडगा दाखवण्याऐवजी पुण्यातील अवैध धंदे व गुन्हेगारी मोडीत काढण्याचे काम करण्याची गरज आहे, असे सपकाळ म्हणाले.

सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश! दिल्ली-NCR मधील सर्व भटक्या कुत्र्यांना उचला, शेल्टरमध्ये सोडा; अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करा

Pune : कुंडेश्वर दर्शनाला जाताना काळाचा घाला; खचाखच भरलेली पिकअप व्हॅन रस्त्याच्या उतारावरून २५-३० फूट खाली कोसळली, ७ जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गाचा महाराजा! सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगळेवेगळे आंदोलन; यंदा थेट महामार्गावरच गणेशोत्सव

वेगमर्यादेचे उल्लंघन! Mumbai Pune Expressway वर ४७० कोटींचे चलन जारी, मात्र...

गरज पडल्यास शस्त्रेही उचलू; जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचा इशारा