महाराष्ट्र

"४८ वर्षांनंतर मी आज पहिल्यांदा...",बाबा सिद्दीकींचा अजित पवार गटात प्रवेश

तटकरे यांच्यासह अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबा सिद्दीकी ४८ वर्षे अधिक काळ काँग्रेसमध्ये होते.

Swapnil S

मुंबई : काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश पार पडला. काही दिवसांपुर्वीच त्यांनी आपल्या काँग्रेसच्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार? याबद्दल चर्चा सुरू होत्या.

मुंबईतील काँग्रेसचा एक महत्त्वाचा नेता, माजी आमजार, माजी मंत्री आणि पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले बाबा सिद्दीकी यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. शनिवारी, १० फेब्रुवारी रोजी त्यांनी अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्तेही अजित पवार गटात सहभागी झाले. बाबा सिद्धिकी यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला प्रफुल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे यांच्यासह अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबा सिद्दीकी ४८ वर्षांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये होते.

बाबा सिद्दीकी आपल्या भाषणात सुरुवातीलाच म्हणाले की, "गेल्या ४८ वर्षांनंतर मी आज पहिल्यांदा काँग्रेससाठी भाषण करत नाहीय". बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याच्या निर्णयाबाबत म्हणाले, "प्रफुल्ल पटेल यांच्या घरी न्याहारी करताना ही चर्चा झाली, त्याच दिवशी १० तारखेला मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असे ठरले. मी त्याच दिवशी काँग्रेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आणि ४८ वर्षांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. मी एक खुले पुस्तक आहे. मी कुटुंबाचा माणूस आहे. मला कोणाचेही नुकसान करायचे नाही. येथे समजाचे राजकारण सुरू आहे, त्यामुळे निर्णय घ्यावा लागला. मी सांगितले की, मला डिवचू नका, अन्यथा मी सोडणार नाही. मी विश्वासघात करणार नाही. मला प्रत्येक हातात अजित पवारांचे घड्याळ हवे आहे. तसंच, सर्वांना सोबत घेऊन चालायचं आहे. आपल्या पूर्वजांनी जे स्वप्न पाहिलं होतं तसा भारत निर्माण करू."

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले