प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या निर्वाह व प्रसाधन भत्त्यात वाढ; ४३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना दिलासा

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह असून यात ४३ हजार ८५८ विद्यार्थीनी प्रवेश घेतला आहे. या मुलांना देण्यात येणाऱ्या निर्वाह भत्ता व स्वच्छता प्रसाधनासाठी देण्यात येणाऱ्या भत्त्यात दुपटीने वाढ करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह असून यात ४३ हजार ८५८ विद्यार्थीनी प्रवेश घेतला आहे. या मुलांना देण्यात येणाऱ्या निर्वाह भत्ता व स्वच्छता प्रसाधनासाठी देण्यात येणाऱ्या भत्त्यात दुपटीने वाढ करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ४३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भत्त्यात वाढ केल्याने राज्य सरकारने वाढ केल्यामुळे दरवर्षी ८० कोटी ९७ लाख ८३ हजार १४६ रुपयांचा वाढीव खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीय मुला-मुलींसाठीच्या शिक्षणासाठी शासकीय वसतिगृहे ही योजना राबविली जाते.

राज्यात ४४३ शासकीय वसतिगृहे आहेत. मुलांच्या २३० वसतिगृहात २३ हजार २०८ तर मुलींच्या २१३ वसतिगृहात २० हजार ६५० मुलींची प्रवेश क्षमता आहे. याप्रमाणे शासकीय वसतिगृहात एकूण ४३ हजार ८५८ विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येते.

नुकताच आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारितील वसतिगृहातील मुला-मुलींच्या सोयी-सुविधा भत्त्यांमध्ये वाढ करण्यास ४ जुलै, २०२५ च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वसतिगृहातील मुला-मुलींसाठीच्या निर्वाह भत्त्यात आणि मुलींना स्वच्छता प्रसाधनासाठीच्या आणि इतर भत्त्यात वाढ करण्यास मान्यता देण्यात आली.

आवाज बंद कर डीजे, तुला ‘बाप्पा’ची शपथ हाय...; मुंबईकरांनीही दिली 'डीजे'च्या दणदणाटाविरोधात हाक, गणेशोत्सव मंडळेही सरसावली

Mumbai : एआय गॉगल्स, चष्म्यामुळे छुप्या रेकॉर्डिंगचा धोका; पालिका कार्यालयात तातडीने बंदी घाला - सचिन पडवळ

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार सुगंधी दूध; येत्या १५ सप्टेंबरपासून राज्यभर पुरवठा

Mumbai : बाप्पाच्या आगमनावेळी चपलांचा ढीग; लालबाग, परळमध्ये सापडलेल्या चार मेट्रिक टन चपलांचा पुनर्वापर

पोलिसांकडूनच अमली पदार्थांची विक्री; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांचा आरोप, २०२९ पर्यंत समूळ उच्चाटनाचा निर्धार