हितेंद्र ठाकूर यांच्या 'बविआ'ला मोठा दिलासा; निवडणूक चिन्हाला हायकोर्टाची परवानगी 
महाराष्ट्र

हितेंद्र ठाकूर यांच्या 'बविआ'ला मोठा दिलासा; निवडणूक चिन्हाला हायकोर्टाची परवानगी

आगामी विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला.

Swapnil S

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. केंद्रीय निवडणूक आयोगाने जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी राखून ठेवलेले शिटी हे निवडणूक चिन्ह बहुजन विकास आघाडीला देण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि न्यामूर्ती न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने हा आदेश देत याचिका निकाली काढली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने ३० जानेवारी २०२४ रोजी पत्र जारी करून जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी शिटी हे निवडणूक चिन्ह राखून ठेवले. यामुळे वाद निर्माण झाला. या परिपत्रकाला आक्षेप घेत बहुजन विकास आघाडी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. यश देवल यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

या याचिकेवर सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि न्यामूर्ती न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली. यावेळी अ‍ॅड. दातार आणि अ‍ॅड. देवल यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्राला आक्षेप घेतला. २००९ पासून गेली १५ वर्षे शिटी चिन्हाचा वापर बहुजन विकास आघाडी महाराष्ट्रात करीत आहे. या चिन्हावर आमचे आमदार-खासदार निवडून आले. पालघर जिल्ह्यात आमचे तीन आमदार आहेत. २०१८ मध्ये लोकसभा निवडणुकीत शिटी चिन्ह मिळून नये म्हणून विरोधकांनी प्रयत्न केले, मात्र २०१९ ची विधानसभा निवडणूक शिटीवर लढविली याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने अ‍ॅड. अक्षय शिंदे यांनी जनता दल (युनायटेड) पक्षाने नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्रात निवडणूक लढविणार नसल्याचे पत्र पाठवून शिटी चिन्ह परत करीत असल्याची माहिती दिली. याची दखल घेत खंडपीठाने याचिका निकाली काढली.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय : सर्व स्मार्टफोनमध्ये ‘संचार साथी’ ॲप अनिवार्य; सायबर फसवणुकीवर लगाम

"काँटनेवाले अंदर बैठे हैं"; संसदेत श्वान आणणाऱ्या खासदार रेणुका चौधरींचा सरकारवर निशाणा, भाजपकडून कारवाईची मागणी

मुंबईत पुन्हा हाय अलर्ट! २ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर

ठाणे ते दक्षिण मुंबई अवघ्या ३० मिनिटांत! MMRDA कडून एलिव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे एक्स्टेंशनच्या कामाला सुरुवात

'उतावीळ लोकं, उतावीळ कामं'! समांथाने राज निदिमोरूशी 'गुपचूप' केलं लग्न; दिग्दर्शकाच्या पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत