महाराष्ट्र

कमलाकर टाकवळेला जामीन मंजूर ;अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा

Swapnil S

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३१२ कोटींच्या घोटाळा प्रकरणात सीआयडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात आरोपी कमलाकर टाकवळे याला गुरुवारी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्याने अ‍ॅड. प्रशांत राऊळ आणि अ‍ॅड. प्रतीक देशमुख यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर सरकारी पक्षाचे म्हणणे ऐकून घेत न्यायाधीश राहुल रोकडे यांनी टाकवळेला १ लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले.

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील घोटाळा उघडकीस आल्यानंतर टाकवळे आठ वर्षे फरार होता. त्याला यंदा जुलैमध्ये राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली. तो मागील पाच महिने दक्षिण मुंबईतील आर्थर रोड कारागृहात कैद आहे. याच घोटाळा प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या आर्थिक अफरातफरीच्या गुन्ह्यात त्याला अलिकडेच जामीन मंजूर झाला होता. त्यापाठोपाठ त्याला सीआयडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात गुरुवारी विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी जामीन मंजूर करत दिलासा दिला. जामीनाची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो आर्थर रोड कारागृहातून सुटका होईल.

या घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांचीही अलिकडेच जामीनावर तुरुंगातून सुटका झाली. कदम हे आठ वर्षे तुरुंगात होते.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!