महाराष्ट्र

"बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न आज पूर्ण झालं", राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

अयोध्येत राम मंदिर लोकार्पणाचा सोहळा पार पडत असताना उद्धव ठाकरे मात्र, या सोहळ्याला गेले नाहीत. त्यांनी या पार्श्वभूमीवर नाशिक येथील काळाराम मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Rakesh Mali

आज अयोध्येत राम मंदिर लोकार्पण सोहळा पार पडत आहे. नुकतीच रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्याला देशभरातील अनेक दिग्गज उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटाने मात्र या सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला होता. आता रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

आदित्य यांनी "रघुपती राघव राजा राम, पतित पावन सिता राम!" असे म्हणत आज बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांनी या सोहळ्याचे श्रेय कारसेवकांना दिले आहे. सर्व कारसेवकांनी केलेल्या त्यागाचे आणि बलिदानाचे सोनं झालं, असे आदित्य यांनी म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या 'एक्स'हँडलवर याबाबतची पोस्ट केली आहे. या पोस्टच्या शेवटी आदित्य यांनी "प्रभू श्रीरामचंद्रांचा विजय असो! जय श्री सिया राम!", असे म्हटले आहे.

उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात-

अयोध्येत राम मंदिर लोकार्पणाचा सोहळा पार पडत असताना उद्धव ठाकरे मात्र, या सोहळ्याला गेले नाहीत. त्यांनी या पार्श्वभूमीवर नाशिक येथील काळाराम मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांचे नाशिकमध्ये आगमन झाले असून ते सायंकाळी पाच वाजता काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते महाआरतीदेखील करण्यात येणार आहे. तसेच, सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ते गोदा आरती देखील करणार आहेत.

जेवढे महत्त्व अयोध्येला आहे. तेवढेच नाशिकच्या पंचवटीला आहे. अयोध्येत श्री राम राजा आहे. तर इथे(पंचवटीत) त्यांना संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे आम्ही पंचवटीमधील काळाराम मंदिराचे दर्शन घेणार आहोत, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास