Mustafa Shaikh Vlogs/YT
महाराष्ट्र

ईदच्या मिरवणुकीत डीजे, लेझर दिव्यांना बंदी घाला, उच्च न्यायालयात मुस्लिम बांधवांची याचिका

पुण्यातील झुबेर अहमद, नजीर अहमद पीरजादे यांच्यासह ज्येष्ठ मुस्लिम बांधवांच्या वतीने अ‍ॅड. ओवेस पेचकर यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर सोमवार, ९ सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यात पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या ईद मिलाद उन-नबीनिमित्त १६ आणि १७ सप्टेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमध्ये डीजे तसेच लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घाला, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील झुबेर अहमद, नजीर अहमद पीरजादे यांच्यासह ज्येष्ठ मुस्लिम बांधवांच्या वतीने अ‍ॅड. ओवेस पेचकर यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर सोमवार, ९ सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

इस्लाममध्ये पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस ईद मिलाद उन-नबी म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने मुस्लिम बांधवांच्या घरी तसेच धार्मिक ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात येते. तसेच मिरवणुका काढल्या जातात. मात्र गेल्या काही वर्षांत या मिरवणुकीचे स्वरूप पालटले असून मिरवणुकांमध्ये डीजे आणि प्रखर दिव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या मिरवणुकीत मुस्लिम तरुण डीजेच्या ठेक्यावर बेधुंद होऊन नाचताना दिसतात. हा सर्व प्रकार मुस्लिम धर्माची शिकवण, तत्त्वे आणि विचारांच्या विरोधात असल्याचा दावा केला आहे.

घरात चिखल, शेतात पाणीच पाणी! दुष्काळासाठी ओळखणारा मराठवाडा अतिवृष्टीने हैराण; बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : आरोग्य उपचारांसाठी मोठा दिलासा, तर रेल्वे आणि गृहनिर्माण क्षेत्राला चालना

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव