महाराष्ट्र

शहापूर तालुक्यातील धबधब्यांवर जाण्यास बंदी!

अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत.

नवशक्ती Web Desk

शहापूर : शहापूर तालुक्यातील निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी पावसाळ्यात ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक येथून पर्यटक येत असतात. मात्र बाहेरून येणारे पर्यटक तालुक्याच्या भौगोलिक आणि ऐतिहासिक रचनेबद्दल अनभिज्ञ असल्याने येथे पावसाळ्यात ओसंडून वाहणारे धबधबे, धरणे, तलाव आदी ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दि. ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत भातसा धरण, कुंडन, दहिगाव, माहुली किल्याचा पायथा, चेरवली, अशोका धबधबा, खराडे, आजा पर्वत, सापगाव नदी किनारा, कळंभे नदी किनारा, कसारा येथील सर्व धबधबे, कसारा घाट, चोंढे धबधबा या ठिकाणी पावसाळी सहलीसाठी जाऊ नये या करिता, मनाई आदेश काढला आहे. मात्र या मनाई हुकूमाबाबत पर्यटकांकडून नाराजीचा सूर उमटत आहे.
तालुक्यातील धबधबे तलाव तसेच धरणे या ठिकाणी पावसात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यापूर्वी जीवितहानी होण्याच्या घटना या ठिकाणी घडल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राहावी या अनुषंगाने धबधबे, धरण, तलाव या परिसरात १ किलो मीटर सर्व वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे.

वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात जाणे, पोहणे, पाण्याच्या प्रवाहाखाली बसने, धबधब्यावर जाणे, धोका दायक ठिकाणी सेल्फी काढणे, धबधबा परिसरात मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे इत्यादी सर्व बाबींवर प्रतिबंध घालण्यात आले आहे.

BCCI कडून महाभियोगची तयारी; कुणकुण लागताच मोहसीन नक्वींनी UAE बोर्डाकडे सुपूर्द केली ट्रॉफी : रिपोर्ट

आजपासून भारत आणि EFTA व्यापार करार अंमलात; पुढील १५ वर्षांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार

नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’; ८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे; फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट; १३६ कोटींचा ‘दरफरक’ जमा होणार