Beed : कारची 'एसटी'ला धडक; ५ ठार X| 'पीटीआय'च्या व्हिडिओवरून घेतलेला स्क्रीनशॉट
महाराष्ट्र

Beed : कारची 'एसटी'ला धडक; ५ ठार

बीड जिल्ह्यात रविवारी सकाळी खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात एक कार राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसवर आदळली. या अपघातात ११ वर्षांच्या मुलासह पाच जण जागीच ठार झाले आहेत.

Swapnil S

बीड : जिल्ह्यात रविवारी सकाळी खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात एक कार राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसवर आदळली. या अपघातात ११ वर्षांच्या मुलासह पाच जण जागीच ठार झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात सकाळी ११ च्या सुमारास माजलगाव तालुक्यातील खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी क्रॉस रोडवर झाला.

पोलिसांनी सांगितले की, मृतांमध्ये माजलगाव येथील रहिवाशांचा समावेश होता. ते कारने शेजारील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरच्या दिशेने जात असताना, समोरून येणाऱ्या एसटी बसला त्यांची कार धडकली. या अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

ओंकार महादेव गिरी (२४), गजानन महादेव नामदास (३८), त्यांचा मुलगा समर्थ (११), सोमनाथ बडे (२३) आणि अनिल आचार्य (४०) अशी मृतांची नावे आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, पुलावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात भरधाव कारवरील नियंत्रण सुटले आणि ती थेट समोरून येणाऱ्या बसवर आदळली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

७२ पेक्षाही २०२६ चा दुष्काळ कठीण; सप्टेंबरमध्येच आटले जलस्रोत; यंदा पुनर्भरणच नाही

रत्नागिरीकरांना पावसाचा दिलासा! देवरुख परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी

महाराष्ट्र FDA करणार कर्नाटक मॉडेलचा अभ्यास; औषधांची खरेदी किंमत नमूद करण्यासाठी पडताळणी

कंत्राटदारांचे आज आंदोलन; राज्य सरकारकडे ८६ हजार कोटी थकले

Mumbai : हुश्श! उष्णतेच्या लाटेपासून दिलासा; कुलाबा, अंधेरी, भांडुपमध्ये सर्वाधिक खराब हवा